पुढारी ऑनलाईन : नुकतीच दिवाळी झाली. या सणांच्या दिवसांत अनेकदा गोड – धोड किंवा अरबट चरबट खाल्लं जातं. पण कितीही चमचमीत खाल्लं तरी सरतेशेवटी येते ती सात्विक किंवा सध्या जेवणाची. हलक्या आहाराचा विषय निघाला आहेच तर ज्वारीच्या भाकरीच नाव निघण सहाजिक आहे. वाढते वजन असो किंवा मधुमेह ज्वारीची भाकरी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
महाराष्ट्रात असं घर क्वचितच असेल जिथे ज्वारी भाकरी केली जात नाही. अनेक घरात चपातीऐवजी ज्वारीची भाकरी हेच मुख्य अन्न समजलं जातं. पण या भाकरीचे असेही अनेक फायदे आहेत ज्यांच्याशी आम्ही तुमची ओळख करून देतो आहे.
चमचमीत खाल्यानंतर सगळ्यात जास्त सतावणारी चिंता म्हणजे वाढत्या वजनाची. पण तुम्ही ज्वारीच्या भाकरीचा जेवणात समावेश करत असाल तर वाढत्या वजनाची चिंता करण्याचे तुम्हाला काहीच कारण नाही. चपातीला ज्वारीची भाकरी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यात फायबरचा उत्तम सोर्स आहे. याशिवाय पचनाच्या बऱ्याच समस्या यामुळे दूर होण्यास मदत होते.
ज्वारीमध्ये मिनरल, प्रोटीन आणि विटामीन बी मोठ्या प्रमाणावर असते. याशिवाय ज्वारीत मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, कॅल्शियम असते. यामुळे अत्यंत कमी कॅलरीमध्ये शरीराला परिपूर्ण पोषण मिळते.
ज्वारीची भाकरी हा डाएट फ्रिक लोकांसाठी स्वर्ग आहे असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. कारण ग्लुटेन फ्री अन्न खाणाऱ्यांची पहिली पसंती ज्वारी भाकरी बनू शकते. यातील लोह शरीर पोषणाचा सर्वोत्तम सोर्स आहे.
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास ज्वारीची भाकरी अत्यंत उपयुक्त आहे. ज्वारीत टॅनिन नावाचा घटक असतो. यामुळे शरीरातील स्टार्च कमी होण्यास मदत होते. यामुळे आपसूकच इन्सुलिन लेवल योग्य राहण्यास मदत होते. याशिवाय ज्वारीच्या भाकरीमुळे कॉलेस्टेरोल नियंत्रणात रहात असल्याने ह्रदयरोग्यांसाठीही गुणकारी आहे.