आरक्षणाला फक्त एकाच व्यक्तीचा विरोध : मनोज जरांगे पाटील

आरक्षणाला फक्त एकाच व्यक्तीचा विरोध : मनोज जरांगे पाटील
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मराठा आरक्षणाप्रश्नी लेखी टाईम बॉन्ड (Time Bond) देण्यासाठी येणाऱ्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांना सतत पुढची वेळ दिली जात असल्याने मी चांगलाच परेशान झालो आहे असे मत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. तसेच या संदर्भात बच्चू कडू, संदीपान भुमरे, उदय सामंत यांच्याशी यासंदर्भात बोलणार असल्याचंही जरांगे यांनी यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले, जातीय तणाव आणि आरक्षणाला विरोध हा एका व्यक्तीमुळे होतो आहे. आरक्षण दिले नाही तर सरकार उघडे पडणार. काल आळंदीत चाडेचार वाजताही प्रचंड संख्येने लोक उपस्थित राहतात. पश्चिम महाराष्ट्रतही उत्तम प्रतिसाद आहे. मी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशी तुलना करत नाही. पण मराठा एकजूट झाला यात आनंद आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news