World Cup 2023 : वर्ल्डकप फायनलपूर्वी रंगणार ‘सूर्यकिरण’ चा एअर शो | पुढारी

World Cup 2023 : वर्ल्डकप फायनलपूर्वी रंगणार 'सूर्यकिरण' चा एअर शो

अहमदाबाद : वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. १९ नॉव्हेंबर) होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा हायव्होल्टेज ड्रामा रंगणार असून या सामन्यापूर्वी एका खास एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. २०११ मध्ये समोर श्रीलंकेचा संघ होता, यावेळी ऑस्ट्रेलिया आहे. पण एकच स्वप्न आहे… ती सुंदर चमकणारी ट्रॉफी जिंकण्याचे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय वायुसेनेची ‘सूर्य किरण एरोबटिक टॉम’ ‘एअर शो’ सादर करणार आहे. एका अधिकान्याने गुरुवारी ही माहिती दिली. संरक्षण विभागाचे गुजरात जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणाले की सर्यकिरण एरोबटिक संघ मोटेरा परिसरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांसाठी आपल्या स्टंटने लोकांना रोमांचित करेल.

पीआरओने एका निवेदनात म्हटले आहे की, एअर शोचा सराव शुक्रवारी आणि शनिवारी होईल. बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून भारताने वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर गुरुवारी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ३ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण प्रोबेटिक टीममध्ये सामान्यतः नऊ विमानांचा समावेश असतो आणि त्यांनी देशभरात अनेक एअर शो केले आहेत.

Back to top button