Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार, ९ नोव्हेंबर २०२३ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार, ९ नोव्हेंबर २०२३

राशिभविष्य

 

मेष : आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामाचा तपास होऊ शकतो. अशात जर काही चुकी केली असेल तर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागू शकतात.

वृषभ

वृषभ : तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. मनाला रिझविण्यासाठी चांगला दिवस पण, काम असेल तर लक्ष देणे गरजेचे.

राशिभविष्य

मिथुन : सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडातरी दयाळूपणा दाखवा.

कर्क

कर्क : तुम्हाला विजय मिळू शकतो आणि धन लाभही होऊ शकतो. आज तुम्ही जाणार असलेल्या विशेष एकत्रिकरण सोहळ्यात चमकणार आहात.

सिंह

सिंह : तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.

कन्या

कन्या : कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. जोडीदार तुमच्यापासून अंतर ठेवेल.

तुळ

तूळ : आर्थिक आघाडीवरील सुधारणा महत्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. नातेवाईक व मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील.

राशिभविष्य

वृश्चिक: तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. घरची कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल.

राशिभविष्य

धनु : काहीतरी मोठया कामात सहभागी व्हाल आणि तुम्हाला याबद्दल पारितोषिके मिळेल. तुमचे कौतुक होईल. मनोबल उंचावेल आणि आनंदी राहाल.

राशिभविष्य

मकर : कामातील अवघड टप्पा सहकाऱ्यांच्या मदतीमुळे पार पडेल. त्यामुळे व्यावसायिक बाजू सांभाळणे आणि स्थान पुन्हा मिळवणे शक्य होईल.

कुंभ

कुंभ : मेहनत करूनच योग्य परिणाम मिळतील. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आर्थिक आवक चांगली राहिल.

मीन

मीन : प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. कामातील चुका कबुल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारणमीमांसा करणे गरजेचे.

Back to top button