Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? मंगळवार ७ नोव्हेंबर २०२३ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? मंगळवार ७ नोव्हेंबर २०२३

मेष : ठरावीक काळाने येणारा मानसिक, शारीरिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी विश्रांतीची गरज आहे.

वृषभ : तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करेल, अशी अपेक्षा बाळगू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.

मिथुन : आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. घरातील कुणा सदस्याच्या व्यवहाराने चिंतीत राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे.

कर्क : समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. कोणत्याही संकटावर मात करायची इच्छाशक्ती जबर आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

सिंह : तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणार्‍या सर्व संधींचे सोने करा. तुमचा रिकामा वेळ वापरा. कामात व्यस्त राहा.

कन्या : तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. त्यामुळे मनावर ताबा ठेवा.

तूळ : तुम्ही बर्‍याच काळ विचार करण्यात घालवू शकतात. तुमचे तुमच्या जोडीदाराशी भांडण होईल. पण, जोडीदार समजून घेईल. सर्व सुरळीत होईल.

वृश्चिक : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा; अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल.

धनु : गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे.

मकर : इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे. जोडीदाराबरोबर वेळ घालवा.

कुंभ : मुले तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरू शकतो. मनावर ताबा ठेवा.

मीन : सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button