महाड एमआयडीसीतील ब्‍ल्यू जेट कंपनीत भीषण स्‍फोट; कामगार अडकल्‍याची भीती | पुढारी

महाड एमआयडीसीतील ब्‍ल्यू जेट कंपनीत भीषण स्‍फोट; कामगार अडकल्‍याची भीती

महाड; पुढारी वृत्‍तसेवा महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रामध्ये असलेल्या ब्‍ल्यू जेट या कंपनीमध्ये सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास स्पोट झाला. यामध्ये कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्‍याचे वृत्‍त नाही. मात्र काही कामगार अडकल्‍याची भीती वर्तवण्यात येत आहे.

या ठिकाणी मोठी आग लागली आहे. मात्र येथे सुरू असलेल्या आगीच्या व स्फोटाच्या ठिकाणी वायू गळतीच्या शक्‍यतेने प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्यात अग्निशमन दलाला संबंधित शासकीय यंत्रणांना आगीवर नियंत्रण मिळवण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात प्राप्त झालेल्या वृत्तानुसार, कारखान्यामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मोठ्या दुखापती होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, मात्र या संदर्भात कोणताही अधिकृत खुलासा हा संबंधित कारखाना अथवा स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. आगीचे वृत्त समजताच महाड फायर स्टेशनच्या पथकासह शेजारील कारखान्यातील अग्निशमन बंब तसेच मार्गच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र कारखान्यामध्ये सुरू असलेल्या स्पोटाच्या मालिकेने प्रत्यक्ष घटनास्थळापर्यंत जाता येत नसल्याचेही दिसून येत आहे.

Back to top button