उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे-पाटील रुग्णालयात | पुढारी

उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे-पाटील रुग्णालयात

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. उपोषणादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी उल्कानगरी येथील गॅलक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (दि. 2) रात्री 10 च्या सुमारास दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. गुरुवारी मुंबईहून आलेल्या या समितीसोबत चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. नंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील उल्का नगरी परिसरातील गॅलक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचाराला सुरुवात करण्यात आल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी सांगितले.

Back to top button