Maratha Reservation Protest : सुरवड ग्रामपंचायतीच्या सर्व 9 सदस्यांचे राजीनामे | पुढारी

Maratha Reservation Protest : सुरवड ग्रामपंचायतीच्या सर्व 9 सदस्यांचे राजीनामे

बावडा :पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे सध्या प्राणांतिक उपोषण सुरु आहे. सदरच्या प्राणांतिक उपोषणास पाठिंबा म्हणून सुरवड (ता.इंदापूर) ग्रामपंचायतीच्या सर्व 9 सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे मंगळवारी (दि.31) राजीनामे दिले. यासंबंधीचे राजीनामा पत्र या 9 ग्रा. पं. सदस्यांनी सरपंच योगिता शिंदे यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये जाऊन सुपूर्द केले. गीतांजली संजय कोरटकर, प्रियंका राहुल म्होपरकर, सोनाली तात्यासाहेब कोरटकर, प्रियंका धनाजी वाघ, पायल बाबासाहेब भोसले, प्रदीप वसंत कांबळे, अतुल दत्तात्रय सूळ, रावसाहेब उत्तम घोगरे, आण्णासाहेब साहेबराव घोगरे अशी राजीनामा दिलेल्या 9 सदस्यांची नावे आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या
Back to top button