Maratha Reservation Agitation : मानवतमध्ये मराठा आंदोलन चिघळले, तहसीलदारांची गाडी फोडली | पुढारी

Maratha Reservation Agitation : मानवतमध्ये मराठा आंदोलन चिघळले, तहसीलदारांची गाडी फोडली

डॉ सचिन चिद्रवार

मानवत

मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तालुक्यात शांततेत सुरू असलेले आंदोलन सोमवारी ता. ३० रोजी चिघळले. (Maratha Reservation Agitation) आंदोलनकर्त्यांना भेटायला गेलेल्या मानवतचे तहसीलदार यांची गाडी मानोली येथे फोडण्यात आली. (Maratha Reservation Agitation)

याबाबत माहिती अशी की, मराठा समाजास आरक्षण मिळावे व मनोज जरांगे यांचे समर्थनार्थ मानवत तालुक्यातील सावळी, कोल्हा, रामपुरी येथे तर मानवत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सोमवार ता. ३० पासून बेमुदत उपोषण सुरू झाले आहे . शहरासह गावागावात मोटरसायकल रॅली व सायंकाळी कँडल मार्च काढले जात आहेत.

सोमवारी ता. ३० आरक्षणासाठी तालुक्यातील मानोली येथील काही कार्यकर्त्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य नाही झाल्यास पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने दखल घेत मानोलीला सकाळी ११ च्या सुमारास धाव घेतली.

निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार रंजीतसिंह कोळेकर आपल्या जीप (क्रमांक एम एच २२डी ४) ने माणोली येथे गेले असता काही आंदोलनकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केले. यावेळी गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर पोलिसांनी टाकीवर चढलेल्या आंदोलकांची समजूत काढून त्यांना खाली उतरवले.

Back to top button