अमानुषतेचा कळस ! मादी श्वानावर बलात्कार करून तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले | पुढारी

अमानुषतेचा कळस ! मादी श्वानावर बलात्कार करून तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले

पुढारी ऑनलाईन : माणुसकी संपली आहे कि अशी शंका यावी अशीच घटना ग्रेटर नोएडामध्ये घडली आहे. एका व्यक्तीने मादी श्वानावर बलात्कार केला. यानंतर कृत्य उघडकीस येण्याच्या भीतीने त्या श्वानास तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. त्याच्या शेजाऱ्याने हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले. आरोपी सोनवीर हा मूळचा मथुरेचा असून ग्रेटर नोएडा येथे भाड्याच्या घरात रहात होता अशी माहिती मिळाली होती.

बुधवारी रात्री त्याने एका भटक्या मादी श्वानाला घरी आणले. दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत नेले, तिला बांधले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार समजल्यावर घटनास्थळी गर्दी जमली होती. गर्दी पाहताच सोनवीर तिसऱ्या मजल्यावर गेला. तेथून त्याने या श्वानाला खाली फेकले. पोलिसानी सोनवीरला अटक केली आहे. त्याच्यावर प्राण्यांच्या क्रूरतेशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या दरम्यान गंभीर जखमी झालेल्या मादी कुत्र्यावर उपचार सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button