Maratha Reservation : नागेश शिनगारे यांचा शिवसेना तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा | पुढारी

Maratha Reservation : नागेश शिनगारे यांचा शिवसेना तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

धारूर (जि. बीड) पुढारी वृत्तसेवा – अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण साठी उपोषण करत आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धारूर येथील सकल मराठा समाजाकडून (Maratha Reservation ) साखळी उपोषण २७ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सुरू केले. या उपोषण स्थळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष नागेश शिनगारे यांनी भेट दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, असे यावेळी सांगितले. यावेळी सकल मराठा समाजाकडून नागेश शिनगारे यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. (Maratha Reservation)

मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे-पाटील यांनी १७ दिवस बेमुदत उपोषण केले. पाटील यांनी ४० दिवसांचा अवधी दिला तरीही राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी न लागल्याने पुन्हा मनोज जरांगे पाटील हे २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत या उपोषणाला पाठीबा देण्यासाठी धारूर येथे २७ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी साखळी उपोषण सुरू केले.

या उपोषण स्थळी उबाठा शिवसेना गडाचे नागेश शिनगारे यांनी भेट देऊन आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला जोपर्यंत मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही, मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पक्षाचे काम करणार नसल्याचे यावेळी नागेश शिनगारे यांनी उपस्थित मराठा बांधवांना सांगितले.

Back to top button