तुळजाभवानी चरणी 9 दिवसांत 12 किलो चांदी, पाऊण किलो सोने अर्पण | पुढारी

तुळजाभवानी चरणी 9 दिवसांत 12 किलो चांदी, पाऊण किलो सोने अर्पण

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सवातील नऊ दिवसांत भाविकांनी तुळजाभवानी चरणी पाऊण किलो सोने, तर 12 किलो चांदी अर्पण केली आहे. तुळजाभवानीच्या उत्पन्नात या कालावधीत पावणेचार कोटी रुपयांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक 1 कोटी 93 लाख रुपये सशुल्क दर्शनातून मिळाले आहेत.

घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत नवरात्रीच्या 9 दिवसांत दररोज लाखावर भाविकांनी तीर्थक्षेत्र तुळजापुरात हजेरी लावली. या कालावधीत भाविकांनी तुळजाभवानीच्या दानपेटीत भरभरून दान टाकले आहे. यामध्ये रोख रकमेसह मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचा समावेश आहे. नवरात्र महोत्सवात मंदिर संस्थानने सशुल्क दर्शन शुल्कात वाढ करत 100 ऐवजी 300 रुपये केले होते. याशिवाय 500 रुपयांचे व्हीआयपी दर्शन सुरूच होते. नवरात्रीच्या दिवसांत 3 लाख 73 हजार 247 भाविकांनी सशुल्क दर्शनाचा लाभ घेतला. या माध्यमातून सर्वाधिक 1 कोटी 93 लाख 66 हजार 462 रुपये उत्पन्न मिळाले.

Back to top button