Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार २६ ऑक्टोबर २०२३

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

मेष : श्री गणेश सांगतात वेळेचा वापर अत्यंत विचारपूर्वक करा. दिनचर्येबद्दल तुम्ही जे काही नियोजन केले आहे, त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. स्थावर मालमत्तेची खरेदी किंवा विक्रीचे व्यवहार पुढे ढकला. गुंतवणुकीसाठी नियोजन करत असाल तर सध्याची वेळ सकारात्मक नाही, त्यामुळे नुकसान होईल. कोणत्याही कारणाशिवाय मनात नैराश्याची भावना येईल. त्यामुळे सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांशी संवाद वाढवा.

वृषभ : श्री गणेश सांगतात तुमच्यातील आत्मविश्वास आणि क्षमता यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील. अडचणीच्या वेळी शासनाशी संबंधित व्यक्तींची मदत मिळेल. पण जवळच्या नातेवाईकाच्या प्रकृतीमुळे चिंता वाटेल. मित्रांना आर्थिक मदत करावी लागेल. छोट्या गोष्टींमुळे घरात वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. पतीपत्नीतील नाते मधूर राहील. पोटासंबंधित तक्रारींकडे दुलर्क्ष करू नका.

मिथुन :
श्री गणेश सांगतात तुमची निर्णयक्षमता आणि काम संपवण्याचा धडाका यामुळे आज यश मिळेल. अडकलेला पैसा मिळेल. अडचणीच्या वेळी वृद्धांचा सल्ला कामी येईल. काही वेळा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील आणि ध्येयापासून विचलित व्हाल. विद्यार्थ्यांचेही अभ्यासावरून दुलर्क्ष होऊ शकेल. कोणत्याही बेकायदेशीर कामात गुंतू नका. कामाच्या ठिकाणी स्पर्धा जाणवेल. पतीपत्नीतील संबंध मधूर राहतील. प्रकृती चांगली राहील.

कर्क : श्री गणेश सांगतात आज तुम्हाला संयमी राहावे लागेल. एखादी गोष्ट खोलवर जाऊन समजून घेणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे हे तुमचे वैशिष्ट्य आहे. जवळच्या नातलगाकडून आनंदाची बातमी समजेल. काही जणांचे नकारात्मक विचार तुम्हाला परावृत्त करतील, त्यामुळे स्वतःच आत्मविश्वास टिकवून ठेवा. चुकीच्या गोष्टींवर वेळ घालवण्यापेक्षा कुटुंबाला वेळ द्या. ज्येष्ठांना वेळ द्या. व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.

सिंह : श्री गणेश सांगतात प्रतिकुल परिस्थितीत तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेतून मार्ग काढाल. काही काळापासून रखडलेल्या प्रश्नावर मार्ग निघाल्याने तुम्हाला आनंद होईल. नातेवाईक आणि मित्र यांच्याशी नातेसंबंध सुधारतील. नियोजन करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. मनात नकारात्मक विचार येणार नाहीत, याची काळजी घ्या. व्यवसायिक घडामोडी थंड राहातील. जोडीदाराच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. तुमची तब्येत चांगली राहील.

कन्या : श्री गणेश सांगतात नियोजनबद्ध काम केले तर तुम्हाला नक्की यश मिळेल. वडिलांचा किंवा तुम्हाला वडिलासमान असलेल्या व्यक्तीकडून पाठबळ मिळेल. घरातील लहान मुलांमुळे वातावरण आनंदी राहील. जुन्या गोष्टींमुळे घरातील वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्या. आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींत वेळ द्या, त्यामुळे मनात सकारात्मक विचार येतील. व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस सामान्य जाईल. घरातील गोष्टींमुळे वाद निर्माण होतील.

तूळ : तुम्हाला आज जास्त काम लागेल, पण तुमच्या क्षमतेनुसार काम करा. आनंदाची बातमी कळेल, त्यामुळे भावनिकरीत्या कणखर बनाल, तुमच्या व्यक्तिमत्त्वातही बदल होईल. पण काका-पुतण्या यातील नाते बिघडू शकते. तुमचा राग आणि अहंकार यावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी महत्त्वाचे निर्णय घेऊ नका, चालू कामावरच लक्ष केंद्रित करा. घरातील वातावरण चांगले राहील. खाण्यपिण्याबद्दल काळजी घ्या.

वृश्चिक : श्री गणेश सांगतात बराच काळ रखडलेल्या एखाद्या समस्येवर उपाय निघेल. गुंतवणुकीसंबंधित निर्णय कौटुंबात चर्चा करून घ्या. तरुणांना मुलाखतीत यश येईल, नियोजन चांगले करा. गडबडीत केलेल्या कामात काही अडचणी येतील. मनात नकारात्मक विचार येतील. आत्मचिंतन करून हे विचार काढून टाका. व्यावसायिक स्थिती थोडीफार चांगली राहील. बाहेरच्या व्यक्तींना तुमच्या कौटुंबिक गोष्टीत हस्तक्षेप करू देऊ नका.

धनु :कल्पक आणि कलात्मक गोष्टींत मन रमेल. त्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि मानसिक समाधान लाभेल. घरगुती कामातही मन रमवाल. पण अनावश्यक खर्च होणार नाही, याकडे लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती थोडी खराब राहील. नवे नियोजन करण्याबद्दल दूमत राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर संयम ठेवणे आवश्यक राहील. पतीपत्नीत घराच्या स्थितीबद्दल वाद होतील.

मकर : सामाजिक कार्यात असलेल्या संस्थांना सहकार्य करा आणि त्यांच्या कामाची दखल घ्या, यातून तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि कामाची पद्धत यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांच्या कष्टाला न्याय मिळेल. रिलेशनशिपमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. वेळेचा उपयोग शांतपणे आणि विचारपूर्वक करा. चुकीच्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा सकारात्मक कार्यात जास्त वेळ द्या. व्यावसायिक निर्णय चर्चा करून घ्या.

कुंभ : श्री गणेश सांगतात भूतकाळातील चुकांपासून धडे घेण्याची ही वेळ आहे. तुम्ही तुमच्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल. तसेच रिलेशनशिपमधील वादही यशस्वरीत्या सोडवाल. विद्यार्थी मुलाखती आणि करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करतील. कामाचा जास्तीचा ताण घेऊ नका. वैयक्तिक बाबींवरही लक्ष द्या. प्रेमसंबंधांना कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. तुमच्या सकारात्मक विचारांमुळे कार्यक्षमता वाढेल.

मीन : श्री गणेश सांगतात गेल्या काही काळापासून रखडलेल्या प्रश्नांबद्दल काही सकारात्मकता दिसेल. नातेवाईकांसोबत बिघडलेले संबंध सुधारतील आणि तुमची गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवाल. उत्पन्न आणि खर्च यात ताळमेळ ठेवा. आज व्यवसायासंबंधी नियोजन टाळा. जास्त कामामुळे कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. अर्धशिशी आणि डोकेदुखी याचा त्रास होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news