आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार २५, २०२३

Published on

– ज्यो. मंगेश महाडिक

मेष : नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात विचार करून चालण्याची गरज. मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या चोरी होऊ शक्यतात.

वृषभ : वाईट काळात पैसा तुमच्या कामी येईल म्हणून आजपासूनच पैशांची बचत करण्याचा विचार करा अथवा समस्यांचा सामना करावा लागू शकतो..


मिथुन : विश्रांती, विरंगुळ्यासाठी मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. कमिशन आणि मानधनाद्वारे फायदे मिळतील. गोपनीय माहिती उघड करू नका.


कर्क : प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवाल. दिवस आनंदात जाईल. प्रेम करायला शिका आणि प्रियसीला व्यक्त होण्याची संधी द्या.


सिंह : प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर गोष्टींना व्यक्त करू शकाल. प्रेम चांगल्या वैवाहिक आयुष्याचे मूलतत्त्व आहे.


कन्या : आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी वेळ खर्च करा. उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल.


तूळ : तुमचा मत्सरी स्वभाव खिन्न करील. परंतु, ही स्वतः ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत
बोलू नका.


वृश्चिक : करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता.


धनु : कार्य क्षेत्रात चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल.


मकर फायद्यासाठी बुद्धिमत्तेची ताकद वापरा. नवीन संकल्पना देण्याबरोबरच व्यावसायिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.


कुंभ : कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका.


मीन : अतिचितेने आणि तणावामुळे त्रासून जाल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news