Nagar News : महावितरणला थकबाकीदारांचा ’शॉक’ | पुढारी

Nagar News : महावितरणला थकबाकीदारांचा ’शॉक’

नगर तालुका :  पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या नगर तालुक्यातील जेऊर येथील विभागांतर्गत घरगुती, औद्योगिक थकबाकीदारांनी कंपनीला चांगलाच ‘शॉक’ दिल्याचे पाहावयास मिळत आहे. जेऊर विभागांतर्गत घरगुती, तसेच औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे 12 लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणचे कनिष्ठ अभियंता सागर बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत वसुलीसाठी कर्मचार्‍यांनी मोहीम हाती घेतली आहे. मोठी थकबाकी असल्याने महावितरण कंपनीलाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

जेऊर विभागांतर्गत येणार्‍या सर्व गावांतील नागरिकांनी आपले घरगुती, तसेच औद्योगिक थकबाकीचे बिल जमा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन कनिष्ठ अभियंता सागर बेंडकुळे यांनी केले. तालुक्यात सर्वांधिक थकबाकी जेऊर विभागाकडे आहे. थकबाकी वाढल्यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांनी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली असून, सर्व थकबाकीदारांनी बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

 

संबंधित बातम्या
Back to top button