World Mental Health Day 2023 : मानसिक आजार शारीरिक दुखण्यासारखेच | पुढारी

World Mental Health Day 2023 : मानसिक आजार शारीरिक दुखण्यासारखेच

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: आजच्या धावपळीच्या जगात सवानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. त्यात काही जणांना धक्का बसतो. मात्र, मानसिक आजार हे शारीरिक दुखण्याप्रमाणेच असतात. त्यांवर योग्य उपचार घेतले, की आजार बरे होतात. त्याप्रमाणेच मानसिक आजारदेखील उपचाराने बरा होऊ शकतो, असे मानसोपचार तज्त्र डॉ. मेराज कादरी यांनी सांगितले.
दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. (World Mental Health Day )

यावर्षीची थीम मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क आहे. म्हणजेच मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि सार्वत्रिक मानवी हक्क म्हणून प्रत्येकाच्या मानसिक आरोग्याला प्रोत्साहन आणि संरक्षण देणारी कृती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

डॉ. मेराज कादरी म्हणाले, की आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रमाणेच मनाची काळजी घेणे म्हणजेच मानसिक आरोग्य जपणे, हे आरोग्यासाठी आवश्यक असते. अन्यथा मानसिक आरोग्याचा परिणाम हळूहळू शारीरिक आरोग्यावर झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत.
मानसिक ताणतणावामुळे अनेक तरुणांचे आरोग्य बिघडले आहे. अशा वेळी मानसिक आरोग्य बिघडलेल्या एखाद्या व्यक्तीला तिच्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवणे, त्यांना सार्वजनिक जीवनातून वगळणे, त्यांच्याशी भेदभाव करणे चुकीचे आहे. योग्य उपचाराने मानसिक आजार बरा होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्य बिघडल्यास त्या व्यक्तीला लवकरात- लवकर मानसोपचार तज्जांकडे न्यावे. असा सल्लाही त्यांनी दिला. (World Mental Health Day )

आपला दृष्टिकोन बदलणे बनली काळाची गरज

मानसिक आजार असेल, त्या व्यक्तीला मानवी हक्कांपासून वंचित ठेवता येत नाही. याबाबतीत आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, जसे एखाद्या व्यक्तीचे हात-पाय तुटले तर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाते. तसेच मानसिक आजारांचेदेखील आहे. असेही डॉ. मेराज कादरी यांनी नमूद केले.

मानसिक आरोग्याचे संरक्षण

मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क आहे, या थीमनुसार यंदा जगातील नागरिकांना उत्तम मानसिक आरोग्य उपलब्ध होईल असे वातावरण तयार करणे, मानसिक आरोग्याचे संरक्षण सुनिश्चित करणे यासाठी आरोग्य संघटना काम करत आहेत. (World Mental Health Day )

Back to top button