Horoscope Today | आजचे राशिभविष्य; शुक्रवार ६ ऑक्‍टोबर २०२३, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

चिराग दारूवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आज तुमच्‍यासाठी वेळ आव्हानात्मक असेल, मात्र आपण आपल्या योग्यता आणि कठोर परिश्रमाद्वारे प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असाल, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्‍या कामाची प्रशंसा होईल. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबातील सदस्‍यांशी चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत सौम्य मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील कामाची गती थोडी संथ असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. तब्येतीला जपा.

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज काळ थोडा अनुकूल राहील. तुम्‍ही तुमच्‍या विशेष कौशल्यांचा वापर कराल. नातेवाईक आणि मित्रांशी संवाद साधाल. विद्यार्थी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतील. आर्थिक अडचण जाणवेल. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रकृतीच्‍या तक्रारी जाणवतील.

मिथुन : आजचा दिवस खूप व्यस्त राहील, असे श्रीगणेश सांगतात. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक होऊन कामे पूर्ण करणे फायदेशीर ठरेल. नकारात्मक गोष्टींपासून लांब राहा. व्यवसायाबाबतचे निर्णय गांभीर्याने घ्‍या. जोडीदार आणि कुटुंबातील व्‍यक्‍तीचा भावनिक आधार मिळेल. आरोग्य चांगले राहिल.

कर्क : आज दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील. नकारात्मक विचारांपासून लांब राहा. असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. नवीन माहिती मिळवण्यात वेळ जाईल. घरातील कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा.

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही मेहनतीने परिस्थिती अनुकूल बनवू शकता. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये घाई करू नका. धर्म आणि कर्माशी संबंधित बाबींमध्येही तुमचे योगदान असेल. जवळच्या नातेवाईकांसोबत वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद वाढू शकतो. कोणताही निर्णय घेताना मन स्थिर ठेवा. आरोग्य उत्तम राहिल.

कन्या : महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः अनुकूल असेल, असे श्रीगणेश सांगतात. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. वैवाहिक संबंध मधुर होतील.

तूळ : आज तुम्ही नियोजनामुळे अनेक गोष्टी व्यवस्थितपणे करू शकाल. राजकीय संबंध दृढ होतील आणि फायदेशीरही ठरतील, असे श्रीगणेश सांगतात. मुलांच्या करिअरशी संबंधित समस्येवर उपाय मिळाल्‍याने दिलासा मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहू शकते.

वृश्चिक : आज दिवसाचा बराचसा वेळ आध्यात्मिक कार्यात जाईल. यामुळे मानसिक शांतीही मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राखण्यात तुमची विशेष भूमिका असेल, असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही विशेष विषयावर चर्चा होईल. मुलांवर जास्त नियंत्रण ठेवू नका. जुनी मैत्री प्रेमाच्या नात्यात बदलू शकते.

धनु : आज बाहेरील व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. काहीवेळा तुमचा अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त राहिल्यामुळे व्यवसायाशी संबंधित बहुतेक कामे घरबसल्या पूर्ण करता येतील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : आज बहुतांश वेळ तुमच्या वैयक्तिक आणि आवडीच्या कामात घालवाल. यामुळे तुमच्यात नवीन ऊर्जा निर्माण होंईल, असे श्रीगणेश म्‍हणतात. कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखाल. प्रकृतीची काळजी घ्‍या.

कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आज सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल, यामुळे तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळेल. जवळचे नातेवाईक किंवा मित्र ईर्षेमुळे तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवसायात आर्थिक बाबींवर लक्ष ठेवावे लागेल.

मीन : जवळच्या नातेवाईकाशी एखाद्या विशेष विषयावर गंभीर चर्चा होईल, असे श्रीगणेश सांगतात. बांधकामाशी संबंधित रखडलेल्‍या कामाावर व महत्त्वाच्या योजनांवर निर्णय घेऊ शकता. कार्यक्षेत्रात दूरदृष्टीने काम करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news