

पुढारी ऑनलाइन डेस्क : Pakistan Exports Beggar : दहशतवाद पोसल्यानंतर आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेल्या पाकिस्तानने चीनला गाढवे निर्यात केली. त्यानंतर आता पाकिस्तान भिकारी निर्यात करणारा देश ठरत आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये ताब्यात घेतलेल्या भिकाऱ्यांपैकी 90 टक्के भिकारी हे पाकिस्तानचे आहेत. परदेशातील पाकिस्तानी सचिवांनी नुकतेच एका स्थायी समितीला याची माहिती दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, इराक आणि सौदी अरेबियाच्या तुरुंगात बंद असलेले 90 टक्के भिकारी हे पाकिस्तानी आहेत.
पाकिस्तान दहशतवादाला पोसणारा देश आहे. भारत या दहशतवादाचा बळी ठरला आहे. डबघाईला आलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्थेला तारण्यासाठी पाकिस्तान हा गाढवे निर्यात करत होता. त्याने चीनला मोठ्या प्रमाणात गाढवे निर्यात केली होती. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत पाकिस्तानमधील गरिबी 39.4 टक्क्यांपर्यंत वाढली असून, खराब आर्थिक परिस्थितीमुळे आणखी 12.5 दशलक्ष लोक सापळ्यात अडकले आहेत, असे जागतिक बँकेने यापूर्वी म्हटले आहे. परिणामी पाकिस्तानची आता वेगळीच ओळख निर्माण होत आहे. ती म्हणजे भिकारी निर्यात करणार देश. (Pakistan Exports Beggar) पाकिस्तानसाठी ही निश्चितपणे लाजीरवाणी बाब आहे.
दहशतवादाची निर्यात करणाऱ्या पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली आहे. गरीब पाकिस्तानी यामध्ये मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे. परिणामी पाकिस्तानमधून पश्चिम आशियायी देशांमध्ये भीक मागण्यांसाठी जाणाऱ्या भिकाऱ्यांचा ओघ खूप मोठा आहे. या समस्येने एवढे एवढे प्रमाण वाढले आहे की सौदी अरेबिया आणि इराक सारख्या देशांनी आता पाकिस्तान सरकारला भिकाऱ्यांचा प्रवाह रोखण्याची विनंती केली आहे. परदेशी पाकिस्तानींच्या स्थायी समितीने नुकतीच ही चिंता व्यक्त केली.
तसेच इराकी आणि सौदी अरेबियाच्या मुत्सद्दींनी दावा केला आहे की त्यांच्या तुरुंगांमध्ये पाकिस्तानी भिकाऱ्यांनी गर्दी केली आहे, ते म्हणाले की ही बाब पाकिस्तानसाठी जागतिक पातळीवर अतिशय लाजीरवाणी ठरणार आहे.
ओव्हरसीज पाकिस्तानचे सचिव झीशान खानजादा यांनी म्हटले आहे की, पश्चिम आशियाई राष्ट्रांमध्ये ताब्यात घेतलेल्या सर्व भिकाऱ्यांपैकी 90 टक्के भिकारी पाकिस्तानचे आहेत. ते सध्या इराक आणि सौदी अरेबियाच्या तुरुंगात बंद आहेत.
हे भिकारी पाकिस्तानातून उमराह व्हिसावर झियारत म्हणजेच तीर्थयात्रेच्या नावाखाली येतात. त्यानंतर माघारी न जाता रस्त्यावर भीक मागत बसतात. असे पाकिस्तानच्या जिओ न्यूज उर्दूने खानजादाच्या हवाल्याने म्हटले आहे.
भिकारीच नाही तर पकडण्यात आलेले पाकिटमार देखील पाकिस्तानी आहेत. द न्यूज इंटरनॅशनलने याचे वृत्त दिले आहे. द न्यूज इंटरनॅशनलच्या माहितीनुसार, मक्काच्या ग्रँड मशिदीमधून अटक करण्यात आलेले बहुतांश पाकिटमार पाकिस्तानी नागरिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिनेटर मंजूर काकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जीशान खानजादा यांनी स्थायी समितीला माहिती दिली की परदेशात जवळपास 10 दशलक्ष पाकिस्तानी नागरिक राहतात, ज्यापैकी एक मोठी संख्या भीक मागण्यात गुंतलेली आहे. या व्यक्ती व्हिसा मिळवतात आणि नंतर इतर देशांमध्ये भीक मागण्याचा अवलंब करतात, ते म्हणाले की पाकिस्तानमधून मध्यपूर्वेला जाणारी उड्डाणे अनेकदा भिकाऱ्यांनी भरलेली असतात.
यूएईमध्ये 1,600,000 पाकिस्तानी आणि कतारमध्ये 200,000 पाकिस्तानी उपस्थित असल्याची माहिती समितीला देण्यात आली होती, अशी माहिती पाकिस्तानच्या द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिली आहे.
हे ही वाचा :