Akasa Airlines : राकेश झुनझुनवाला यांची अकासा एअरलाईन्स वर्षभरातचं अडचणीत; २४ वैमानिकांचा एकत्र राजीनामा | पुढारी

Akasa Airlines : राकेश झुनझुनवाला यांची अकासा एअरलाईन्स वर्षभरातचं अडचणीत; २४ वैमानिकांचा एकत्र राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जायचे. त्यांची अकासा एअर ही कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. कंपीनीने उड्डाणे सुरु करुन वर्ष देखील पूर्ण झालेले नाही. अवघ्या वर्षभरातचं कंपनी गंभीर संकटात सापडली आहे. कंपनीच्या ४३ वैमानिकांनी एकदम राजीनामा दिल्यामुळे दररोज तब्बल २४ उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. दिवंगत बिगबुल राकेश झुनझुनवाला यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. (Akasa Airlines)

दररोज तब्बल २४ उड्डाणे रद्द (Akasa Airlines)

कंपनीच्या वैमानिकांनी नोटीस पेरियड पूर्ण न करता अचानक काम बंद केले आहे, असा दावा अकासा एअरलाईन्सच्या वकिलांनी केला आहे. या वैमानिकांचा ६ महिने किंवा १ वर्षाचा नोटीस पेरियड होता. वैमानिकांनी राजीनामा देत काम बंद केल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनी बंद पडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Akasa Airlines)

वैमानिकांनी रायवल एअरलाईन्समध्ये काम सुरु केले

दरम्यान, असाका एअरलाईन्समध्ये राजीनामा दिल्यानंतर असाका एअरलाईन्सने रायवल एअरलाईन्समध्ये काम सुरु केले आहे. कंपनीने न्यायालयात DGCA च्या नियमांनुसार नोटीस पेरियड वैमानिकांना लागू करण्याची मागणी केली आहे. दिवंगत राकेश झुनझुनवाला यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचे ऑगस्ट २०२२ मध्ये निधन झाले होते. (Akasa Airlines)

हेही वाचलंत का? 

Back to top button