Attack on Sikh Student : कॅनडात 17 वर्षीय शीख विद्यार्थ्यावर हल्ला; चौकशी सुरू | पुढारी

Attack on Sikh Student : कॅनडात 17 वर्षीय शीख विद्यार्थ्यावर हल्ला; चौकशी सुरू

पुढारी ऑनलाइन न्यूज : Attack on Sikh Student : कॅनडात ब्रिटीश कोलंबियामधील बस स्टॉपवर एका 17 वर्षीय शीख तरुणावर हल्ला करण्यात आला. द्वेषातून हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या विद्यार्थ्याचे दुसऱ्या एका किशोरवयीन मुलासोबत भांडणे झाली. त्यानंतर या शीख विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याला लाथा बुक्क्यांनी मारण्यात आले. तसेच मिरपूड फवारण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 11) केलोना येथे रुटलँड रोड साउथ आणि रॉबसन रोड ईस्टच्या मध्यभागी घडली, असे वृत्त कॅनडाच्या माध्यमांमध्ये देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 17 वर्षीय शीख विद्यार्थी घरी जाताना सार्वजनिक परिवहन बसमधून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या किशोरवयीन मुलाने बिअर किंवा मिरपूड फवारली होती. या हल्ल्यापूर्वी बसमध्ये या दोघांमध्ये भांडणे झाली होती. त्यामुळे दोघांना बाहेर काढण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. Attack on Sikh Student

पोलिसांनी अधिक तपशील जाहीर केला नसला तरी कॅनडाच्या जागतिक शीख संघटनेने आरोप केला आहे की वाहनात असतानाही विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला.

Attack on Sikh Student : प्रथम धमकावले नंतर मारहाण

सीटीव्ही न्यूज रिपोर्टने शीख संघटनेच्या विधानाचा हवाला देत म्हटले आहे की, विद्यार्थ्याला बसस्टॉपवर सुरुवातीपासूनच त्रास देण्यात येत होता. बस स्टॉपवर प्रथम दोन व्यक्तींनी विद्यार्थ्याजवळ जाऊन त्याला बसमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला आणि नंतर बसमध्ये बसण्यास परवानगी देऊन त्याला लाइटर आणि फोन देऊन धमकावण्यात आले. तसेच त्यांच्या फोनवर जवळून त्याचे रेकॉर्डिंग करू लागले.

Attack on Sikh Student : ब्रिटिश कोलंबियाकडून घटनेचा निषेध; वर्षभरात हा दुसरा हल्ला

ब्रिटीश कोलंबियाच्या WSO उपाध्यक्ष गुंतास कौर यांनी सांगितले की, केलोना येथील हायस्कूलच्या शीख विद्यार्थ्यावर सोमवारी झालेला हल्ला धक्कादायक आणि अस्वीकार्य आहे.

सार्वजनिक वाहतूक स्थळांवर शिख तरुणांविरुद्ध हिंसाचाराची ही दुसरी घटना आहे. मार्चच्या सुरुवातीला, भारतातील 21 वर्षीय शीख विद्यार्थी, गगनदीप सिंग, याच्यावर ब्रिटिश कोलंबिया प्रांतात अज्ञात व्यक्तींच्या गटाने हल्ला केला होता ज्यांनी त्याची पगडी फाडली आणि त्याला केसांनी फुटपाथवर ओढले.

हे ही वाचा :

Back to top button