खलिस्तानियांचा भारतीयांवर हल्ला!(Video) | पुढारी

लंडन: पुढारी ऑनलाईन

पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर जगभरात पाकिस्तानविरूद्ध संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर लंडन येथील भारतीयांनी पाकविरूद्ध घोषणाबाजी करत आंदोलन केले होते. यानंतर काल शनिवारी (दी.९) दुपारी लंडनमधील उच्चयोगाबाहेर भारतीय लोक जमले होते.यावेळी खलिस्तानियांनी भारतीयांवर हल्ला केल्याची घटना घडली.

लंडन येथील भारतीय उच्चयोगाबाहेर कामानिमीत्त भारतीय लोक एकत्र जमले होते. त्याचवेळी खलिस्तानचे समर्थक तिथे पोहचले आणि भारत विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर खलिस्तानी आणि पाकिस्तानी ध्वज फडकावत भारतीयांवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तानी समर्थकांचे पाकिस्तान आयएसआय संघटनेशी संबध असल्याचे सांगितले जात आहे.

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यमध्ये भारतीय ४० जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये १६ फेब्रुवारीला भारतीयांनी पाकविरोधात घोषणाबाजी करत आंदोनल केले होते. यावेळी पाकवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news