Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार १४, २०२३

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

मेष : श्रीगणेश म्‍हणतात, आजचा बहुतांश वेळ नातेवाईकांसोबत व्‍यतित कराल. ग्रहस्थिती लाभदायक स्‍थिती निर्माण करत आहेत, त्यामुळे या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशीसंभाषण किंवा महत्त्वाचे काम करण्यापूर्वी सखोल चौकशी करा. आरोग्य चांगले राहील.

वृषभ : आज तुम्‍हाला सर्जनशील कार्यात रुची राहील, असे श्रीगणेश सांगतात.जुन्या समस्येवर उपाय शोधाल. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्‍या. धोकादायक कामांपासून दूर राहा. नातेवाईकांशीही वाद होतील;पण कुणाच्या तरी हस्तक्षेपाने ते ओटोक्‍यात राहतील. नोकरीच्या ठिकाणी रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात समन्वय राखला जाईल.

मिथुन : धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही तुमची आवड वाढेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. तुम्‍ही तुमच्‍या संपर्कावर लक्ष ठेवावे. जवळच्या नातेवाईकाशी किंवा मित्राशी मतभेद होण्‍याची शक्‍यता. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवास टाळा. थकवा जाणवू शकतो. पती-पत्नीचे एकमेकांशी चांगले संबंध राहतील. शारीरिक तक्रारी जाणविण्‍याची शक्‍यता.

कर्क : गणेश म्हणतात, आज कोणत्याही फोन कॉलकडे दुर्लक्ष करू नका, कारण महत्त्वाच्या सूचना प्राप्त होऊ शकतात. मार्केटिंग आणि मीडियावर लक्ष केंद्रित करा. हे उपक्रम तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी खूप फायदेशीर ठरतील. भविष्यासाठी नियोजन करताना इतरांपेक्षा स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. जोडीदाराचा सल्ला आणि सहकार्य राहील. बदलत्या वातावरणामुळे अशक्तपणा, थकवा जाणवू शकतो.

सिंह : कौटुंबिक आणि आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस शुभ आहे, अस श्रीगणेश सांगतात. वैयक्तिक कामात यश मिळाल्याने मनःशांती मिळेल. सर्वात कठीण कामे दृढनिश्चयाने पूर्ण करण्याची क्षमता ठेवा. आत्मविश्वासाने काम करा, यश नक्की मिळेल. चुकीच्या सल्ल्याला बळी पडू शकता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते.

कन्या : आजचा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा. आत्मनिरीक्षण केल्याने तुम्हाला खूप मनःशांती मिळेल. अनेक समस्याही सुटू शकतात, असे श्रीगणेश म्‍हणतात. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. इतर लोकांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी योग्य समन्वय ठेवल्यास कामाला गती मिळेल. घरातील सदस्य एकमेकांशी परिपूर्ण सुसंवाद साधतील. विशेषत: महिला आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहतील.

तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज जीवनाला सकारात्मक पद्धतीने समजून घेतल्‍यास चांगले यश लाभेल. तुमचा धर्म आणि अध्यात्मावरील विश्वासामुळे शांती मिळेल. कोणालाही न विचारता सल्ला देऊ नका. विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन फिरण्‍यात वेळ घालविण्‍याची शक्‍यता. कौटुंबिक वातावरणासह आरोग्‍य उत्तम राहू शकते.

वृश्चिक : आज घर नूतनीकरण किंवा बदलाशी संबंधित नियोजन कराल, असे श्रीगणेश म्‍हणतात. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचा किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल परंतु अनोळखी व्यक्तींकडून कोणताही व्यवहार किंवा सल्ला घेणे टाळा. कार्यक्षेत्रात काही चांगले परिणाम मिळतील. पती-पत्नीचे नाते सकारात्मक आणि सहकार्याचे असेल. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता.

धनु : श्रीगणेश म्हणतात, आज घरातील वातावरण सकारात्मक राहील. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली देयके परत मिळण्‍याची शक्‍यता. शेजाऱ्यांशी मतभेद टाळा. तरुणांनी आपल्या करिअरबाबत अधिक जागरूक राहावे. आज कामाच्या ठिकाणी तणाव असू शकतो. अतिकामामुळे कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. तणाव आणि थकवा जाणवेल.

मकर : आज घरामध्ये शांतता राहील, असे श्रीगणेश सांगतात. जवळच्या मित्राचे सहकार्यही तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास टिकवून ठेवेल. मुलांच्‍या संबंधित कामात व्‍यस्‍त राहाल. व्यवसायातील कामे सध्या मंद असू शकतात. घर आणि कुटुंबात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य राहिल. आरोग्य उत्तम राहिल.

कुंभ : आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील, असे श्रीगणेश म्‍हणतात. आज अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त राहाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात निश्चित धोरण तयार करून काम करा. पती-पत्नी एकमेकांशी असलेला संवाद चांगल्या प्रकारे समजून घेतील. नकारात्मक वातावरण आणि हवामान बदलापासून सावध रहा

मीन : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कोणतेही कठीण काम कठोर परिश्रमाने सोडविण्याची क्षमता तुमच्यात असेल. घरात उत्सवाचे वातावरण राहिल. तुमच्या जवळच्या मित्रांवर आणि नातेवाईकांवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवा.पती-पत्नीमध्ये सुसंवाद राखता येईल. मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news