‘ओबीसी’ला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळायला हवे : प्रकाश आंबेडकर | पुढारी

'ओबीसी'ला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळायला हवे : प्रकाश आंबेडकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचे ८ व्या दिवशी उपोषण सुरू आहे. दरम्यान येथे झालेल्या पोलिसांच्या लाठीमार घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सर्व पक्षीय नेत्यांचा ओघ वाढू लागला आहे. आज (दि. ५) वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

आंबेडकर म्हणाले की, आरक्षणाचा प्रश्न नवा नाही. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. समाजाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. आरक्षणाबाबत मंडळ आयोगाकडून काहींनाच फायदा झाल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. परंतु, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळायला हवे, असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आरक्षणासाठी एक दिवसाचा लढा काही उपयोगाचा नसतो. तर आरक्षण मिळेपर्यंत लढा पुढे कायम ठेवावा लागेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button