Maharashtra Politics | ‘मंत्री केले नाही तर बायको स्वतःला संपवेल’, शिंदे गटातील आमदाराकडून गौप्यस्फोट

Maharashtra Politics | ‘मंत्री केले नाही तर बायको स्वतःला संपवेल’, शिंदे गटातील आमदाराकडून गौप्यस्फोट
Published on
Updated on

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा, प्रत्येकवेळी माझी बायको आत्महत्या करेल, मला राणे संपवतील अशी ही ना ती कारणे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर दबाव आणून आमच्यातील काहींनी मंत्रिपदे मिळवली. या दबावतंत्रात आम्ही बाहेरच राहिलो, अशी खंत शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार भरत गोगावले यांनी अलिबाग येथे व्यक्त केली. त्यांचा रोख हा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे होता. (Maharashtra Politics)

अलिबाग येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना गोगावले म्हणाले, आम्ही प्रत्येक वेळी आहे. थांबून राहायचं असंच झाले आहे. अनेकजण अनेक कारणे सांगतात आणि मंत्रिपद मिळवतात; पण आता आम्ही थांबणार नाही, असे सांगत गोगावले यांनी आपल्याला मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली. रायगडच्या विकासासाठी आम्ही मंत्रिपदाची मागणी केली होती; पण आजपर्यंत आम्हाला यश मिळाले नाही. भविष्यात ते मिळावे, अशी अपेक्षा आहे.

मंत्री केले नाही तर माझी पत्नी आत्महत्या करेल, असा दावा एका आमदाराने केला होता. तर कोकणातील एका आमदाराने, मंत्रिपद न मिळाल्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे मला संपवतील, असे कारण पुढे केले होते. तिसऱ्या एक आमदाराने, मंत्रिमंडळात समावेश न केल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याची धमकी दिली होती, असा गौप्यस्फोट गोगावले यांनी केला आहे. शिंदे हे त्यांच्यासारख्या लोकांमुळेच मुख्यमंत्री झाले, असेही त्यांनी म्हटले आहे.

म्हणून मी मंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली…

आमदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले (Raigad MLA and Shiv Sena chief whip Bharat Gogawale)  यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी विचित्र कारणे देऊन मंत्रीपद मिळवल्याचा दावा केला आहे. "आमचे मुख्यमंत्री अडचणीत आहेत. म्हणून मी मंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. पण काय झाले माहित आहे का?. एकाने (आमदार) मला मंत्रिपद मिळाले नाही तर माझी पत्नी आत्महत्या करेल असे कारण पुढे केले. एकाने नारायण राणे मला संपवतील, तर एक म्हणाला मी राजीनामा देईन," अशी ही ना ती कारणे दिल्याचा दावा गोगावले यांनी केला आहे. (Maharashtra Politics)

शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड केले आणि त्यांनी एकना शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपशी हातमिळवणी केली. तेव्हापासून गोगावले मंत्री होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. आता त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news