चादर बदलायला बेडरूममध्ये गेली आणि समोर आला…

चादर बदलायला बेडरूममध्ये गेली आणि समोर आला…

मेलबर्न : जगातील सर्वाधिक धोकादायक सरपटणारे प्राणी सापडणारा देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. तिथे अगदी टॉयलेटमधील कमोडपासून ते रस्त्याच्या बाजूलाही साप आणि मगरी आढळून येतात. असाच थरारक अनुभव क्विन्सलॅण्डमधील एका महिलेला नुकताच आला. या महिलेच्या बेडवर 6 फूट लांबीचा विषारी साप लपला होता. तोही साधासुधा म्हणजेच बिनविषारी नव्हे, तर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा विषारी साप. ही महिला आपल्या बेडरूममधील चादर बदलण्यासाठी गेली होती. त्यावेळेस तिला बेडवर हा साप दिसला. उपलब्ध माहितीनुसार हा ऑस्ट्रेलियामध्ये सापडणार्‍या सर्वात विषारी सापांच्या प्रजातींपैकी ईस्टर्न ब्राऊन प्रजातीचा साप आहे. बिछान्यावर साप पाहताच या महिलेने बेडरूमचा दरवाजा लावला. शिवाय साप दाराच्या फटीतून बाहेर येऊ नये म्हणून दाराजवळ टॉवेलही टाकला. पाठोपाठ सर्पमित्रांना फोन केला.

6 फूट लांबी 

हा साप पकडण्यासाठी गेलेल्या जॅचेरीज रिचर्डस् यांनी नेमका घटनाक्रम सांगितला आहे. मी कॉल आल्यानंतर तातडीने या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा ती दारातच माझी वाट पाहत होती. मी बेडरूममध्ये गेलो, त्यावेळी मला समोरच्या बेडवर हा साप दिसला. सहा फूट लांबीचा तो साप दाराच्या दिशेनेच पाहत होता. त्यांनीच या अत्यंत विषारी सापाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बाहेरील उष्णतेपासून वाचण्याच्या उद्देशाने हा साप घरात शिरला असावा, असा अंदाज रिचर्डस् यांनी व्यक्त केला आहे. सापाला पकडून त्यांनी जवळच्या झुडपांमध्ये सोडून दिले. या महिलेने जशी समयसूचकता दाखविली तशीच ती इतरांनाही दाखवावी, असे रिचर्डस् यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news