5G Service : ‘VI’ ची तक्रार; Jio Airtel चे 5G चे अमर्यादित डेटा ऑफर बंद होणार व दरही महागणार?

5G Services
5G Services
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : देशात 5G सेवा (5G Service )सुरू होऊन 6 महिने पूर्ण झाले आहे. एअरटेल आणि जिओ या दोन्ही टेलिकॉम कंपन्या ही सेवा देत आहेत. सध्या दोन्ही कंपन्या ग्राहकांना 4G च्या दरातच 5G ची सेवा पुरवत आहेत. सध्या दोन्ही कंपन्या ग्राहकांना त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा ऑफर देत आहेत. मात्र, लवकरच 5G सेवेतील हे अमर्यादित डेटा ऑफरवर लवकरच मर्यादा येऊ  शकतात. कारण व्होडाफोन आयडियाने ट्रायकडे तक्रार दिली आहे. त्यामुळे ट्राय जिओ आणि एअरटेलला तसे निर्देश देऊ शकते. फायनान्शिअल एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. जाणून घ्या सविस्तर…

देशात 1 ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 व्या मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटनासह 5G सेवा (5G Service ) सुरू करण्यात आली होती. सगळ्या पहिले एअरटेलने त्यापाठोपाठ जिओने सुद्धा 5G च्या सेवा सुरू केल्या आहेत. सध्या या कंपन्यांची सेवा 5600 शहरात पोहोचली आहे. अवघ्या सहा महिन्यात जिओ एअरलटेलने 50 दशलक्ष सदस्य मिळवले आहेत. सध्या दोन्ही कंपन्या ग्राहकांना 4G च्या दरातच 5G ची सेवा पुरवत आहे. तसेच सध्या दोन्ही कंपन्या ग्राहकांना त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा ऑफर देत आहेत. मात्र, लवकरच 5G सेवेतील हे अमर्यादित डेटा ऑफर बंद होऊ शकतात. कारण व्होडाफोन आयडियाने ट्रॉयकडे तक्रार दिली आहे. त्यामुळे ट्राय जिओ आणि एअरटेलला तसे निर्देश देऊ शकते.

5G Service : काय आहे व्होडाफोन आयडियाची तक्रार

व्होडाफोन आयडिया सध्या 5G सेवा पुरवत नाही. मात्र, कंपनीने रिलायन्स जिओ आमि भारती एअरटेल या दोन कंपन्यांविरुद्ध भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणकडे (ट्राय) 'पिरॉडिटरी प्राइसिंग'ची (मार्केटमध्ये वस्तू आणि सेवेचे दर अत्यंत कमी करणे जेणेकरून अन्य कंपन्या मार्केटच्या प्रतिस्पर्धेतून बाहेर पडतील) तक्रार केली आहे.

Vodafone Idea ने म्हटले होते की या दोघांकडे लक्षणीय बाजार शक्ती (सर्कलमध्ये 30% मार्केट शेअर) आहे आणि त्यांचे 5G टॅरिफ पिरॉडिटरी प्राइसिंग आहेत. कारण ते कमी किमतीच्या सेवा देतात. व्होडाफोन आयडियाने अद्याप 5G सेवा आणल्या नसल्या तरी, Jio आणि Airtel त्यांना 4G सेवांप्रमाणेच दर देत आहेत, अशी तक्रार व्होडाफोन आयडियाने केली आहे.

5G Service : 'व्होडाफोन आयडियाच्या तक्रारीवर ट्रायचे निरीक्षण आणि निष्कर्ष

व्होडाफोन आयडियाच्या तक्रारीवर ट्रायने तपासणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार तपासणी नंतर ट्रायने असे मत व्यक्त केले की दोन्ही कंपन्यांचे दर हे पातळी किंमतीपेक्षा कमी नाही. तसेच 4G चाया दरात 5G ऑफर करणे याला पिरॉडिटरी प्राइसिंग म्हणता येणार नाही. मात्र, कोणत्याही प्लॅनचा भाग म्हणून अमर्यादित डेटा ऑफर करणे हे टॅरिफ नियमांच्या वाजवी वापर धोरणाच्या विरुद्ध आहे, म्हणून दोघांनी ते थांबवले पाहिजे.

या परिणामाची दिशा म्हणजे Jio आणि Airtel त्यांच्या डेटा प्लॅन 4G दरांवर सुरू ठेवू शकतात, परंतु नवीन बिलिंग सायकल सुरू होण्यापूर्वी डेटा वापरल्यास वेग कमी मर्यादेवर रीसेट करावा लागेल. वाजवी वापर धोरण (FUP) चे तत्त्व 4G योजनांना लागू होते आणि ते 5G टॅरिफलाही लागू झाले पाहिजे, असा निष्कर्ष ट्रायने काढला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

4G प्लॅनवर, टेलिकॉम सेवा प्रदाते जर नवीन बिलिंग सायकल सुरू होण्यापूर्वी ग्राहकांनी त्यांची डेटा मर्यादा संपवली तर डेटा स्पीड 64 Kbps पर्यंत कमी करतात. ऑपरेटरना त्यांच्या वेबसाइटवर टॅरिफ प्लॅनसह ते प्रकाशित करणे आवश्यक आहे आणि डेटा वापर 50%, 90% आणि 100% पर्यंत पोहोचल्यावर सदस्यांना अलर्ट पाठवणे आवश्यक आहे.

5G Service : 'काय आहे तज्ज्ञांचे मत

सध्‍या, जिओ एअरटेलची 5600 शहरात सेवा सुरू असून 50 दशलक्ष ग्राहक 5G ची सेवा घेत आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या मते 5G प्रवेश सध्या तरी कमी आहे आणि टेलिकॉम्सना डेटा कॅप लागू करण्‍यास सांगण्‍यास या क्षणी अर्थ नाही कारण बहुसंख्य वापरकर्ते 4G वर आहेत.
असे असले तरी, ट्रायच्या सूत्रांनी सांगितले की टॅरिफ नियमांनुसार, अमर्यादित डेटा ऑफर करण्यास मनाई आहे, त्यामुळे ऑपरेटरने नियमांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे ट्राय लवकरच रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला तसे निर्देश देऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

परिणामी 5G टॅरिफ प्लॅन अमर्यादित डेटा आता लवकरच मर्यादित होऊ शकतात. मात्र, 4G च्या दरात 5G ची सेवा पुरवणे हे पिरॉडिटरी प्राइसिंगमध्ये मोडत नसल्याने कंपन्या 4G च्या दरात 5G ची सेवा देऊ शकतात. त्यामुळे 5G सेवेचे दर तुर्तास तरी वाढण्याची शक्यता नाही.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news