मोठी बातमी – मार्च २०२३पर्यंत 5G पोहोचणार २०० शहरांत – 5G India rollout

मोठी बातमी – मार्च २०२३पर्यंत 5G पोहोचणार २०० शहरांत – 5G India rollout

पुढारी ऑनलाईन – या महिन्याच्या सुरुवातीला देशात 5G सेवा सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने मार्च २०२३पर्यंत देशातील २०० शहरांत 5G सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे. (5G India rollout)

इंडिया टुडेने ही बातमी दिली आहे. मार्च २०२३पर्यंत २०० शहरांत ही सेवा देणे आणि त्यानंतर ग्रामीण आणि उर्वरित शहरी भागांतही 5G सुविधा पुरवण्याचे नियोजन आहे, असे वैष्णव यांनी म्हटले आहे. इंडिया टुडेने ही बातमी दिली आहे. सरकारने ओडिशातील ५ शहरांत तसेच त्यानंतर ८० टक्के राज्यात या सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या रिलायन्स जिओने चार शहरांत ही सुविधा दिली आहे. तर एअरटेलने ८ शहरांत 5G सेवा सुरू केली आहे. सध्या 5Gसाठीचे प्लॅन या कंपन्यांनी जाहीर केलेल नाहीत. चाचणीच्या टप्प्यात असल्याने ज्या शहरांत 5G सेवा सुरू केली आहे, तिथे आताच्या 4Gच्या प्लॅननुसार किंमत आकारली जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news