Laddu Recipe : खमंग मूग डाळीचे लाडू कसे कराल? | पुढारी

Laddu Recipe : खमंग मूग डाळीचे लाडू कसे कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू (Laddu Recipe), चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडी, मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास ‘मगू डाळ रेसिपी’ रेसिपी पाहूया…

Laddu Recipe

साहित्य

१) एक कप मूग डाळ पीठ

२) अर्धा कप तूप

३) अर्धा कप पिठीसाखर

४) अर्धा कप दूध

५) एक चमचा वेलचीपूड

६) बेदाणे, बदाम, पिस्ता यांचे काप

Laddu Recipe

कृती

१) मूगडाळ रवाळ पद्धतीची दळून आणा. मध्यम गॅसवर पातेलं ठेवून त्यात थोडं तूप गरम करून त्यात मूळ डाळीचे पीठ भाजून घ्या.

२) पीठ भाजत असताना त्याचा रंग बदलला की, त्यावर थोडं दूध शिंपडून ढवळून घ्या. गॅस बंद करा आणि भाजलेलं पीठ खाली उरवून घ्या.

३) भाजलेल्या पीठ थोडंसं थंड झालं की, त्यात पिठीसाखर घाला. ते करत असताना पिठीसाखरेचे गोळे होणार नाहीत, याची काळजी घ्या.

४) त्यानंतर त्या पीठात वेलची पूड आणि कापलेले काजू, बदाम आणि पिस्ता घाला. नंतर त्याचा लाडू बांधा.

टीप : या लाडूसाठी हिरवी आणि पिवळी मूगडाळ वापरू शकता. जर तुम्हाला हे लाडू (Laddu Recipe) पौष्टीक हवे असतील तर सालीसहीत डाळ वापरू शकता.

पहा व्हिडिओ : महाराष्ट्र आणि दिल्लीच्या खाद्यसंस्कृती पासून बनवला तंदुरी वडापाव

या रेसिपी वाचल्यात का? 

Back to top button