

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात उष्णतेची लाट (Heat Wave) आली असून दिल्लीसह बहुतांश भागातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. उष्णतेबरोबर हवेतील आद्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दिल्लीत रविवारी आद्रता ६७ टक्के इतकी नोंदवली गेली. मे महिन्याच्या तुलनेत जून महिना कडक उन्हाळ्याचा ठरत आहे. दिल्लीसोबत हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यातील तापमानातही (Heat Wave) आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
शनिवारी, दिल्लीचे कमाल तापमान 41.8 अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. हंगामाच्या सरासरीपेक्षा दोन अंशांनी जास्त होते. तर किमान तापमान 26.7 अंश सेल्सिअसवर स्थिर होते. जे हंगामाच्या सरासरीपेक्षा एक अंश कमी होते.
राष्ट्रीय राजधानीत रविवारी किमान तापमान 25.2 अंश सेल्सिअसवर स्थिरावले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी आहे. सकाळी 8.30 वाजता सापेक्ष आर्द्रता 67 टक्के नोंदवली गेली. दिवसा 25-35 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
"आयएमडीने पुढील काही दिवस स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामानाचा अंदाज वर्तवल्यामुळे दिल्लीत आणखी उष्ण दिवसांची अपेक्षा आहे. हवामान खात्याने किमान एक आठवडा उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला नसला तरी, अशा परिस्थिती वेगळ्या ठिकाणी येऊ शकतात, असे आयएमडीने म्हटले आहे.
हेही वाचा