नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली | पुढारी

नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या अतंर्गत बदल्या मंगळवारी (दि.6) करण्यात आल्या. मुख्यालयातील विविध विभागातील 39 कर्मचाऱ्यांचे अतंर्गत बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या. यामुळे वर्षोनुवर्षे एकाच विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलले गेले आहेत. तर बांधकाम विभागातील वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचा-यांच्या देखील बदल्या करण्याचे आदेश सीईओ आशिमा मित्तल यांनी दिले आहे. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांच्या देखिल बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूणच जिल्हा परिषदेत सीईओ यांनी भाकरी फिरवल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाच टेबलावर जास्तीत जास्त तीन वर्षे व एका विभागात जास्तीत जास्त पाच वर्षे काम करता येईल असा शासन आदेश आहे. त्यानुसार अंतर्गत बदल्या होणे आवश्यक असताना बदली प्रक्रीया झाली नव्हती. अनेक विभागातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन श्रीमती मित्तल यांनी अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेतला होता. या बदल्या टाळण्यासाठी प्रयत्न झाले. परंतू सीईओ मित्तल बदल्यांवर ठाम राहिल्या. मंगळवारी मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांच्या उपस्थितीत समुपदेशनाव्दारे ही प्रक्रीया पार पडली. काही अधिकारी महिना दोन महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत. लेखा विभागातील 25 कर्मचारी बदलीस पात्र होते. परंतू, य़ापैकी केवळ 8 कर्मचा-यांच्या अतंर्गत बदल्या झालेल्या आहेत. जागा रिक्त नसल्याने बदल्या होऊ शकलेल्या नसल्याचे सांगण्यात आले आहे.

नाव (पदस्थापना)

रणजित पगारे (बांधकाम १, जि. प नाशिक), अनिल गिते (लपा विभाग, जि प नाशिक), सोनाली भार्गवे (साप्रवि, नाशिक), सिताराम हगवणे (शिक्षणाधिकारी कार्या.प्राथमिक), उमेश चव्हाण (एकात्मिक बालविकास, जि प नाशिक), वर्षा सांगळे (आरोग्य विभाग जिप नाशिक), शोभा खैरणार (बांधकाम ३ जि प नाशिक), मनिषा जगताप (बांधकाम ३, जि प नाशिक), अनिता डावरे (पं.स.नाशिक), सलमाबानो शहा (शिक्षणाधिकारी कार्या.प्राथमिक), सुनिता फुलमाळी (शिक्षणाधिकारी कार्या.प्राथमिक), दत्तात्रय कोदे (एकात्मिक बालविकास, जि प नाशिक), देविदास चव्हाण (ग्रा.पा.पु.जि.प.नाशिक), सरोज बागुल (साप्रवि जि प नाशिक), अविनाश आहिरे (बांधकाम १, जि प नाशिक), चंद्रकला राऊत (बांधकाम २, जि.प.नाशिक), सोनाली साठे (बांधकाम जि.प.नाशिक), मिनाक्षी केदारे (आरोग्य विभाग, जि प नाशिक), मिनाक्षी दांडगे (ग्रा.पा.पु.जि.प.नाशिक), नंदा परदेशी (बांधकाम २, जि.प.नाशिक), नम्रता तोटे (साप्रवि जि.प.नाशिक), सुनिल जाधव (आरोग्य विभाग, जि.प.नाशिक), निता शेवाळे (बांधकाम १, जि.प.नाशिक), घनश्याम पवार (ग्रा. पा. पु. उपविभाग, पं.स. नाशिक), रंजिता ठाकरे (पं.स.नाशिक), मनिषा काळे (बांधकाम ३, जि.प.नाशिक), ज्योती निकुंभ (बांधकाम उपविभाग, पं.सं.नाशिक), सुनिता जगताप (पं.सं. नाशिक), परिघा महाले (बांधकाम १, जि.प.), अरुण भोये (शिक्षण विभाग,पं.स नाशिक), सरोजिनी चव्हाण (शिक्षणाधिकारी कार्या माध्यमिक)

कनिष्ठ अभियंता (बांधकाम उपविभाग पदस्थापना)

प्रविण वाघ (इगतपुरी), भाऊसाहेब गावित (कळवण), चेतन गवळी (दिंडोरी), ऋषिकेश गरुड (त्र्यंबकेश्वर), बाप्पासाहेब रांजणे (इगतपुरी), राजेंद्र मोरे (नाशिक), विजय पाटील (नांदगाव), मुकेश गुंजाळ (येवला), जयराम गोवर्धने (सिन्नर).

Back to top button