Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना अनंतात विलीन | पुढारी

Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना अनंतात विलीन

पुढारी ऑनलाइन डेस्क: Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री आणि बॉलीवूडमधील ‘आयकॉनिक’ आई सुलोचना लाटकर या अनंतात विलीन झाल्या आहेत. सुलोचना दीदी यांचे रविवारी (04 जून) वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळ आणि श्वसानाच्या आजाराने निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव प्रभादेवी येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले होते.

दिल्ली दौऱ्याहून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. याशिवाय अनेक दिग्गज कलाकारांनी देखील सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

सुलोचना यांच्या पार्थिवावर आज सोमवारी (दि.05) सायंकाळी 5.30 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलीवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकरांसह, सामाजिक राजकीय क्षेत्रातील दिग्गज देखील उपस्थित होते.

हे ही वाचा :

Amitabh Bachchan: सुलोचना यांच्या निधनानंतर भावूक झाले बिग बी

Sulochana Latkar: सुलोचना दीदींना फाळके पुरस्कार मिळण्याची इच्छा अधुरीच!

Back to top button