Rahul Gandhi on Muslim League : ‘मुस्लिम लीग धर्मनिरपेक्ष’ राहुल गांधींच्या वक्तव्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली | पुढारी

Rahul Gandhi on Muslim League : 'मुस्लिम लीग धर्मनिरपेक्ष' राहुल गांधींच्या वक्तव्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

पुढारी ऑनलाइन डेस्क : Rahul Gandhi on Muslim League : मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात केले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात पुन्हा जुंपली आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजप कडून राहुल गांधी यांची तीव्र निंदा करण्यात येत आहे. तसेच वायनाडमध्ये स्वतःची स्वीकार्यता राखण्यासाठी मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्ष म्हणणे ही राहुल गांधी यांची मजबुरी आहे, असे म्हटले आहे.

Rahul Gandhi on Muslim League : काय म्हटले राहुल गांधी?

राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेतील प्रेस क्लबमध्ये त्यांना केरळमध्ये काँग्रसने इंडियन यूनियन मुस्लिम लीग (IUML) पक्षासोबत युती केली आहे याबाबत विचारले. यावेळी उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले मुस्लिम लीग पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पार्टी आहे. त्यामध्ये काहीही गैर-धर्मनिरपेक्षता नाही आहे.

Rahul Gandhi on Muslim League : राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे भारतात राजकीय आरोप-प्रत्यारोप

राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आहे. भाजपने या वक्तव्यावरून राहुल गांधी यांना चांगलेच घेरले आहे. त्यांची याबाबत तीव्र निंदा केली जात आहे.

हे राहुल गांधींचे कपट

राहुल गांधींच्या या वक्तव्याला भाजपने राहुल गांधींचे कपट म्हटले आहे. भाजप नेता अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, जिना यांनी स्थापन केलेली मुस्लीम लिग ही धार्मिक आधारावर भारताच्या फाळणीला जबाबदार आहे. राहुल गांधी त्याला एक धर्मनिरपेक्ष पार्टी म्हणत आहेत. ते पुढे म्हणाले, राहुल गांधी कमी शिकलेले असले तरी पण याबाबत ते पूर्णपणे कपटी आणि कपटी आहेत. त्यांना वायनाडमध्ये स्वतःची स्वीकार्यता राखून ठेवण्यासाठी मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्ष म्हणणे ही त्यांची मजबुरी आहे.

Rahul Gandhi on Muslim League : काँग्रेसचे भाजपवर पलटवार

भाजपच्या मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर राजकीय आरोप केल्यानंतर काँग्रेसने त्यांना पुन्हा घेरले आहे. काँग्रेस नेता पवन खेडा यांनी मालवीय यांच्यावर जोरदार पलटवार केले. त्यांनी नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपने इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीगच्या दोन सदस्यांचा समावेश केल्याच्या 2012 च्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी मालवीय यांच्यावर निशाणा साधला.

त्यांनी मालवीय यांना विचारले, तू अशिक्षित आहेस का भाऊ? केरळची मुस्लिम लीग आणि जिनांची मुस्लिम लीग यातील फरक माहित नाही? जिना यांची मुस्लीम लीग ही तीच आहे जिच्याशी तुमच्या पूर्वजांनी युती केली होती. दुसरी मुस्लीम लीग आहे जिच्याशी भाजपची युती होती.

हे ही वाचा :

Sedition Act: देशद्रोहाचा कायदा गरजेचा, मात्र त्यात काही सुधारणा केल्या जाऊ शकतात – कायदा आयोगाचा अहवाल

Rahul Gandhi vs BJP : राहुल गांधींकडून देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी विदेशी भूमिचा वापर, भाजपची जोरदार टीका

Back to top button