Shraddha Walker Murder case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात सुनावणी सुरू; लहान भावाकडून मोठा खुलासा; म्हणाला... | पुढारी

Shraddha Walker Murder case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात सुनावणी सुरू; लहान भावाकडून मोठा खुलासा; म्हणाला...

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या खटल्यातील सुनावनीला दिल्लीतील साकेत कोर्टात आजपासून सुरूवात झाली. दरम्यान श्रद्धाचा भाऊ श्रीजय याने मोठा खुलासा केला आहेत. त्यानं कोर्टासमोर साक्ष देताना सांगितले आहे की, या प्रकरणातील आरोपी आफताब हा श्रद्धाशी नेहमीच शाब्दिक बाचाबाची करत आणि तिला नेहमी मारहाण करत असे तिने त्याला सांगितले असल्याचे त्याने कोर्टात स्पष्ट केले.

यानंतर कोर्टाने दिल्लीच्या साकेत कोर्टात १२ जुलै रोजी श्रद्धाचा भाऊ श्रीजयसह तीन फिर्यादी साक्षीदारांची उलटतपासणी होणार असल्याचे आज झालेल्या सुनावणीत स्पष्ट केले. श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात आरोपी आफताब पुनावाला याने महरौली भागात श्रध्दाची निर्घृण हत्या (Shraddha Walker Murder case) केली होती. यानंतर तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करीत त्याची दिल्लीच्या विविध भागात विल्हेवाट लावली होती. ही घटना उघडकिस येताच, आरोपी आफताबला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

सुनावणीच्या पहिल्या दिवशी दिल्ली पोलिसांकडून तीन महत्वपूर्ण साक्षीदार न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यात श्रध्दाचा (Shraddha Walker Murder case) लहान भाऊ, रिक्षाचालक तसेच आफताबने जेथे हत्या केली होती, त्या घराशेजारचा शेजारी असे ते तीन साक्षीदार होते. पोलिस रेकाॅर्डमध्ये असलेले छायाचित्र ओळखत साक्षीदारांच्या जबाबास सुरुवात झाली. सुनावणीला आफताबचे वकील उपस्थित नसल्याने उलटसाक्ष होऊ शकली नाही.

आफताब अमिन पुनावाला याने 18 मे 2022 रोजी श्रध्दाची हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करीत ते फ्रीजमध्ये ठेवले होते. दिल्लीच्या विविध भागात या तुकड्यांची विल्वेवाट लावली होती. मृतदेहाचे बहुतेक तुकडे त्याने छत्तरपूरच्या जंगलात टाकले होते. हत्येच्या दोन वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलिस ठाण्यात श्रध्दाने तक्रार देत आफताब ठार मारुन तुकडे करण्याची धमकी देत असल्याचे म्हटले होते. या प्रकरणात आफताबच्या पालकांनाही आरोपी करावे, अशी मागणी श्रध्दाच्या वडिलांनी (Shraddha Walker Murder case) गत 10 एप्रिल रोजी केली होती. आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही त्यावेळी विकास वालकर यांनी केली होती.

हेही वाचा:

Back to top button