नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | पुढारी

नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना द्वारका परिसरात घडली. संतोष रामदास गादेकर (४०, रा. ओझर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून, विजय केसरी यादव (६२) हे जखमी झाले आहेत. पोलिसांच्या फिर्यादीनुसार, २३ मे रोजी रात्री ९.३० वाजता कारची धडक बसल्याने संतोष यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोडेनगरला आयफोन हिसकावला

नाशिक : खाेडेनगर येथील विठ्ठल मंदिर चौक परिसरातून दुचाकीस्वार चोरट्यांनी मंगेश साहेबराव पगार (३०, रा. वडाळा राेड) यांच्याकडील ६२ हजार ७५० आयफोन हिसकावून नेला आहे. सोमवारी (दि.२९) सकाळी ८.३० वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुग्णवाहिकेच्या धडकेत पादचारी ठार

नाशिक : गोविंदनगर परिसरात रुग्णवाहिकेच्या धडकेत हिरामण केशव जाधव (५२, रा. त्रिकोणी गार्डनजवळ) यांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.२९) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयित रूपेश सुरेश पाटील (२४, रा. शिवाजीनगर, सातपूर) हे रुग्णवाहिका (एमएच १५ जीव्ही ८८२४) चालवत असताना हिरामण जाधव यांना धडक दिली. जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात रूपेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रेल्वेतून पडल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू

नाशिक : गरीब रथ एक्स्प्रेसमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सुबोध हरीश पै (१६, रा. नाशिक) याचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. लहवित ते अस्वली स्थानकांदरम्यान मंगळवारी (दि.३०) दुपारी हा अपघात झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Back to top button