DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार! महागाई भत्ता पुन्हा वाढवण्याची सरकारची तयारी | पुढारी

DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार! महागाई भत्ता पुन्हा वाढवण्याची सरकारची तयारी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते. २०२३ च्या उत्तरार्धात महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. यावेळी सरकार DA सोबत फिटमेंट फॅक्टरबाबतही घोषणा करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ जाहीर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात जोरदार वाढ होणार आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के आहे. (DA Hike)

फिटमेंट फॅक्टर ३.६८ टक्के करण्याची मागणी

सध्या ४२०० रूपये ग्रेड पे असलेल्या कर्मचाऱ्यांना मुळ वेतन १५,५०० रूपये मिळते. अशा प्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्याचे एकूण वेतन १५,५०० च्या २.५७ पटीने किंवा ३९,८३५ रूपये होईल. ६ व्या CPC ने फिटमेंट फॅक्टरमध्ये १.८६ टक्क्यांनी वाढ करण्याची शिफारस केली होती. अशा परिस्थितीत फिटमेंट फॅक्टर ३.६८ टक्के करण्यात यावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. सरकारने ही मागणी मान्य केल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे किमान वेतन १८ हजार रुपयांवरून २६ हजार रुपये होईल. (DA Hike)

पहिल्या सहामाहीसाठी सरकारची डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ

सरकारने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी DA आणि DR चार टक्क्यांनी म्हणजेच ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढवला होता. आता दुसऱ्या सहामाहीसाठी त्यात चार टक्क्यांनी वाढ केली, तर ती ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल. गेल्या वर्षी (2022) मार्चमध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किंवा डीए ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्यात आला होता. त्यानंतर त्यात दोनदा प्रत्येकी चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

हेही वाचा : 

Back to top button