Sanjay Raut | 'आम्ही सांगेल तोच कायदा आणि गुन्हा' अशी देशात सध्या परिस्थिती- संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut | 'आम्ही सांगेल तोच कायदा आणि गुन्हा' अशी देशात सध्या परिस्थिती- संजय राऊत

पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू अहोरात्र आंदोलन करत आहेत. पण हे मोदी सरकारला दिसत नाही, सध्या देशात हुकूमशाही सरकारचे राज्य सुरू आहे. कायद्यावर देखील मालकी हक्क सांगितला जात आहे. आम्ही सांगेल तोच कायदा आणि गुन्हा ही परिस्थिती सध्या देशात आहे, असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, मोदींनी पहिल्यांदा जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झालीत. या ९ वर्षात मोदींनी जनतेला काय दिले? मोदी सरकारची ही नऊ वर्ष देशाला नाकी नऊ आणणारी वर्षे आहेत, अशी टीका राऊत (Sanjay Raut) यांनी केली. तसेच 2024 नंतर देशात युतीचे सरकार येईल, असे देखील उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा:

Back to top button