Air India मध्ये दरमहा 600 जणांची भरती; सीईओ विल्सन यांची माहिती; म्हणाले एअरलाइन दरमहा… | पुढारी

Air India मध्ये दरमहा 600 जणांची भरती; सीईओ विल्सन यांची माहिती; म्हणाले एअरलाइन दरमहा...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Air India मध्ये दरमहा 600 जणांची भरती सुरू आहे. एअर इंडियाच्या परिवर्तन योजना अंतर्गत ही भरती सुरू आहे. सध्या 550 केबिन क्रू मेंबर्स आणि 50 पायलटची दरमहा नियुक्ती केली जात आहे. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी स्वतः याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, एअर इंडियाच्या चांगल्या सुरुवातीसाठी परिवर्तन करत आहोत. आम्हाला उत्तम, स्थिर विमान वाहतूक परिसंस्था हवी आहे.

एअर इंडियाचे (Air India) सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी सोमवारी दिल्ली येथे एका मुलाखतीत पीटीआयला अधिक माहिती दिली. विल्सन यांनी सांगितले की, एअरलाइन दर महिन्याला 550 केबिन क्रू सदस्य आणि 50 वैमानिकांची नियुक्ती करत आहे आणि या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या ताफ्यात सहा वाइड-बॉडी A350 जेट विमाने ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. पुढील 5 वर्षात परिवर्तन योजनेसाठी आम्ही एक चांगली सुरुवात अपेक्षित करत आहे.

खासगीकरणानंतर Air India मध्ये 10 पट केबिन क्रू तर 5 पट पायलट नियुक्ती

विल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, Air India च्या खासगीकरणानंतर आतापर्यंत केबिन क्रू मेंबर्सच्या बाबतीत तब्बल 10 पट तर पायलटच्या बाबतीत 5 पट नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र आणखी किती नियुक्त्या करण्यात येतील याचे निश्चित लक्ष्य सध्या तरी नाही. सध्या दरमहा अंदाजे 550 केबिन क्रू सदस्य आणि 50 पायलट नियुक्त केले जातात आणि त्यांना प्रशिक्षण दिले जाते, असे विल्सन यांनी पीटीआयला सांगितले.

तसेच ते असेही म्हणाले, की कंपनी ज्या गतीने भरती सुरू आहे ती या वर्ष अखेरपर्यंत बहुतेक भागांसाठी सुरू राहील. या वर्षाच्या अखेरीस भरती प्रक्रिया मंद होईल. त्यानंतर विमानाच्या इंडक्शनशी जुळेल अशा पद्धतीने 2024 च्या अखेरीस पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होईल.

एअर इंडियाच्या सीईओने यापूर्वी सांगितले होते की एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने या वर्षाच्या सुरुवातीपासून 500 पेक्षा जास्त पायलट आणि 2,400 केबिन क्रू सदस्यांसह 3,900 लोकांना कामावर घेतले आहे.

हे ही वाचा :

दहावीचा निकाल आठवडाभरात शक्य

Air India फ्लाइटमध्ये एकाला पॅनिक अ‍ॅटॅक; मुंबईला पोहोचेपर्यंत फ्लाईटमध्ये मोठा गोंधळ

Back to top button