NIA Raid : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे NIA ची १३ ठिकाणी छापेमारी; अनेक ठिकाणे सील | पुढारी

NIA Raid : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे NIA ची १३ ठिकाणी छापेमारी; अनेक ठिकाणे सील

पुढारी ऑनलाइन डेस्क : NIA Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एका पथकाने (NIA) शुक्रवारी रात्री उशिरा जबलपूर येथे छापेमारी केली. यावेळी NIA ने १३ ठिकाणी छापे टाकल्याची माहिती आहे. यावेळी NIA पथकासोबत निक पोलीस अधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलीस दलही घटनास्थळी उपस्थित आहे. दहशतवादी कट प्रकरणाशी संबंधित हे छापे टाकण्यात आले आहेत, अशी माहिती एएनआयने ट्वीट करून दिली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा संबंध भोपाळ दहशतवादी फंडिंग प्रकरणाशी आहे ज्यात प्रतिबंधित संघटना जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी)चा समावेश आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दहशतवादी कटात सहभागी असलेल्या संशयितांच्या जागेवर छापे अजूनही सुरू आहेत, अशी माहिती या संबंधित सूत्रांनी दिली आहे.

जेएमबीचा समावेश असलेल्या भोपाळ टेरर फंडिंग प्रकरणात 25 मे रोजी दहशतवादविरोधी एजन्सीने उत्तर प्रदेशातील दोन ठिकाणांची झडती घेतल्यानंतर दोनच दिवसांनी हे नवीन छापे टाकण्यात आले.

या छाप्यांचे उद्दिष्ट आधीच अटक केलेल्या १० आरोपींचे आणखी संबंध आणि कट उघड करणे आणि एनआयए कोर्ट, भोपाळ यांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सहा बांगलादेशी नागरिक असून ते सक्रिय जेएमबी कॅडर आहेत.

बडी ओमटी परिसर केला सील

दैनिक जागरणने दिलेल्या माहितीनुसार, ही टीम अब्दुल रज्जाकचा सहकारी मकसूद कबादी आणि अहद उल्लाह अन्सारी यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. यादरम्यान पोलिसांनी बडी ओमटी परिसर सील केला आहे.

छाप्या दरम्यान तपास पथकाला घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य आणि शस्त्रे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. भोपाळ आणि दिल्लीचे पथक न्यायालयाकडून सर्च वॉरंट घेऊन पोहोचले.

एनआयएने तीन जणांना ताब्यात घेतले

एनआयएचे पथक ओमाटीच्या सिंधी मोहल्लामध्येही पोहोचले आणि त्यांनी येथील काही घरांवर छापे टाकले. कारवाईदरम्यान पथकाने येथून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

अब्दुल रज्जाकच्या घरी शस्त्रे सापडली आहेत

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अब्दुल रज्जाकच्या घरावर छापा टाकला होता. जिथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे. यावेळी अब्दुल रज्जाक आणि त्याचा पुतण्या मोहम्मद शाहबाज यांना अटक करून घराची झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान 12 बोअरची पंप झेनॉन बंदूक, 12 बोअरची डबल बॅरल बंदूक, 315 बोअरची रायफल, एक स्पॉटिंग, 315 बोअरची एक, 0.22 बोअरची अमेरिकन रायफल, इटालियन रायफल याशिवाय 12 बोअरची 8 काडतुसे, 315 बोअरची 2 आणि 315 बोअरची 15 काडतुसे जप्त करण्यात आली. तो जप्त करताना आरोपींवर ओमटी पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली. यामध्ये विदेशी शस्त्रांचाही समावेश होता. यापूर्वी रज्जाकच्या भागीदारीत चालवल्या जाणाऱ्या बेकायदा रेस्टॉरंटवर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर चालवला होता.

NIA Raid

NIA Raid

खूप प्रयत्नानंतर दार उघडले

लहान ओमाती येथील रहिवासी वकील अहद उल्लाह अन्सारी यांच्या घरी ही टीम पोहोचली तेव्हा केंद्रीय पथकाला पाहून अन्सारीच्या मुलाने दरवाजे बंद केले. पथकाने दरवाजा तोडण्याची तयारी केली होती. खूप प्रयत्नानंतर दरवाजा आतून उघडला. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी मोठ्या कारवाईची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. काही मोठी कारवाई होणार आहे, एवढेच पोलिस पथकाला सांगण्यात आले.

हे ही वाचा :

जम्मू-काश्मीर : मुसळधार पावसामुळे घर कोसळून तीन अंध भावांचा मृत्यू

IPL 2023 GT vs MI Qualifier 2 : पराभवानंतर ‘मुंबई इंडियन्‍स’ तुफान ट्रोल, शुभमनमुळेच ‘प्‍ले-ऑफ’मध्‍ये, त्‍याच्‍यामुळेच…

Back to top button