Diwali a federal holiday : अमेरिकेत आता 'दिवाळी'ला अधिकृत 'हॉली डे'; यूएस काँग्रेसमध्ये विधेयक मांडले | पुढारी

Diwali a federal holiday : अमेरिकेत आता 'दिवाळी'ला अधिकृत 'हॉली डे'; यूएस काँग्रेसमध्ये विधेयक मांडले

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali a federal holiday : अमेरिकेत लवकरच दिवाळी हा सण तेथील अधिकृत ‘हॉली डे’ होऊ शकतो. अमेरिकेच्या महिला सांसद ग्रेस मेंग (Grace Meng) यांनी यूएस काँग्रेसमध्ये शुक्रवारी प्रतिनिधी सभेत दिवाळी दिवसाचे विधेयक मांडले. दिवाळीला संघीय अवकाश घोषित करण्याविषयी हे विधेयक आहे. याबाबत देशभरातील विभिन्न समुदायांनी याचे स्वागत केले आहे.

हे विधेयक पारित झाल्यास राष्ट्राध्यक्षांच्या मंजुरीनंतर तो कायदा होईल. तसेच दिवळी ही अमेरिकेत 12 वी संघीय सुट्टी घोषित होईल. विशेष म्हणजे जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी अमेरिकन संसदेत उचललेले हे पाऊल दोन्ही देशांचे मैत्री संबंध वाढण्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात आहेत. Diwali a federal holiday

Diwali a federal holiday : यूएसमधील मोठ्या समुदायासाठी दिवाळी सर्वात महत्वाचा दिवस

याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना ग्रेस मेंग म्हणाल्या की, जगभरातील अब्जावधी लोकांसह युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) मधील असंख्य कुटुंबांसाठी आणि समुदायांसाठी दिवाळी हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. दिवाळीच्या फेडरल सुट्टीमुळे कुटुंबे आणि मित्रांना एकत्र सण साजरा करता येईल. या दिवशीची सुट्टी हे सिद्ध करेल की सरकार देशाच्या विविध सांस्कृतिक संधींना महत्त्व देते.

त्या म्हणाल्या की, मेरिकेची ताकद विविध अनुभव, संस्कृती आणि हे राष्ट्र बनवणाऱ्या समुदायातून येते. न्यूयॉर्क आणि क्वीन्समध्ये, दरवर्षी दिवाळी ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हा कायदा म्हणजे अमेरिकेत विविधता साजरे करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. या दिवसाचे महत्व या कायद्यान्वये सर्व अमेरिकन नागरिकांपर्यंत पोहोचवले जाईल. अमेरिकन काँग्रेस हे विधेयक मंजूर करण्यासाठी इच्छुक आहेत.

Diwali a federal holiday : न्यूयॉर्क असेम्ब्ली सदस्य जेनिफर राजकुमार यांनी केले स्वागत

अमेरिकेतील न्यूयॉर्क असेंब्ली सदस्य जेनिफर राजकुमार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या, “या वर्षी आम्ही आमचे संपूर्ण राज्य दिवाळीच्या समर्थनार्थ आणि दक्षिण आशियाई समुदायाच्या मान्यतेसाठी एक आवाजात बोलताना पाहिले आहे. “सरकारमधील माझी सहकारी, मेंग, आता दिवाळीला फेडरल सुट्टी घोषित करण्यासाठी तिच्या ऐतिहासिक कायद्यासह चळवळ राष्ट्रीय पातळीवर नेत आहे,” ती म्हणाली.

Diwali a federal holiday : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. 21 ते 24 जून दरम्यान ते अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर असतील. या दरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी 22 जून रोजी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये राजकीय मेजवानीचे आयोजन करतील. पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसी येथील हॉटेलमध्ये मुक्काम करतील, जिथे भारतीय समुदाय अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतील. 22 जून रोजी जेव्हा पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले जाईल, तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ 21 तोफांची सलामी दिली जाईल.

हे ही वाचा :

‘प्रशांत किशोरच्या लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी’  

पुणे-बंगळुरू महामार्गावर घुणकी फाट्याजवळ रोडरोलरला आर्टिगा गाडीची भीषण धडक; २ ठार ४ जण गंभीर जखमी

Back to top button