‘प्रशांत किशोरच्या लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी’   | पुढारी

'प्रशांत किशोरच्या लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी'  

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

प्रशांत किशोर यांच्या कोणी  लागू नका नादी, २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी, मग का प्रधानमंत्री  बनणार नाहीत नरेंद्र मोदी?,
अशा शब्‍दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत २०२४ मध्‍ये हाेणार्‍या लाेकसभा निवडणुकीचे भाकित वर्तवले.  

प्रशांत किशोर हे २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींसोबत होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते तरीही या निवडणुकीत ३०३ जागा मिळवित मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही तेथे भाजपला विजय मिळाला आहे. त्यामुळे माझे म्हणणे आहे प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, कारण २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी,असे आठवले यांनी मुंबईत संविधान निवासस्थानी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

वाचा : भाजपला मोठा धक्का! १५ नेत्यांनी भाजपला ठोकला रामराम; त्यामागे होतं ‘हे’ कारण

विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीएसोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या २०२४ च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

वाचा : दिशा पटानीची झाली होती ‘मेमरी लॉस’!…नेमकं काय घडलं होतं?

Back to top button