इम्रान खान यांच्या शरीरात कोकेनचे अंश | पुढारी

इम्रान खान यांच्या शरीरात कोकेनचे अंश

इस्लामाबाद : वृत्तसंस्था : पाकिस्तान सरकारने माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा वैद्यकीय अहवाल जाहीर केला असून, त्यांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीय चाचणीत त्यांच्या लघवीच्या नमुन्यात कोकेन या अमली पदार्थासह अल्कोहोल आढळल्याचे त्यात म्हटले आहे. हा अहवाल पाकिस्तानचे आरोग्यमंत्री अब्दुल कादिर पटेल यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवला.

अहवालाला महत्त्व यासाठी आहे, की तो येण्यापूर्वीच इम्रान यांना सर्व प्रकरणांत खासगी वैद्यकीय अहवालाच्या आधारे जामीन मंजूर झाले आहेत. पाकिस्तानच्या कायद्यानुसार न्यायालयाने केवळ सरकारी रुग्णालयांचे अहवाल स्वीकारायचे असतात.

Back to top button