Sanjay Raut : शिंदे गटाला आम्ही पक्ष मानत नाही; तो भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा - संजय राऊत

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sanjay Raut : शिंदे गटाला आम्ही पक्ष मानत नाही. शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा होय, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर केली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, शिंदे गटाला आम्ही पक्ष मानत नाही. शिंदे गटाकडे स्वतःची विचारधाराही नाही. मिंधे गटाला स्वतःची भूमिका नाही, असे म्हटले आहे. यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, शिवसेनेला 22 काय 5 जागाही मिळणार नाहीत. Sanjay Raut
Sanjay Raut : संसद भवनाचा उद्घाटन सोहळा हा खासगी कार्यक्रम नाही
सध्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे. तसेच निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रपतींचे नाव का नाही यावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी या मुद्द्यावरून संसद भवन उद्गाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले राष्ट्रपतींना निमंत्रण का दिले नाही, हे मोदींनी आणि भाजपने सांगावे. तसेच त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. राऊत म्हणाले, संसद भवनाचे उद्घाटन हा खासगी कार्यक्रम नाही. लायब्ररी आणि संसद भवन यात फरक आहे.
संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या ऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे. या मागणीवरून गेले काही दिवस ठाकरे गट, काँग्रेससह अन्य अनेक विरोधी पक्षांनी यावरून भाजपवर टीका केली आहे. त्यावर फडणवीसांनी जुनी काही उदाहरणे देऊन विरोधकांना सुनावले होते. त्यात त्यांनी राजीव गांधी यांनी लायब्ररीचे उद्घाटन केल्याचा उल्लेख केला होता. यावर राऊतांनी आज लायब्ररी आणि संसद भवन यात फरक आहे, असे म्हणत नाव न घेता फडणवीसांना टोला लगावला. Sanjay Raut
हे ही वाचा :
अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा; नवीन संसद भवनाच्या उद्घाटन स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे लाँच करणार
मोदी वैश्विक नेते : उपमुख्यमंत्री फडणवीस