स्वा. सावरकर विज्ञानवादी; गोमुत्रधारी हिंदुत्व त्यांना मान्य नव्हते – संजय राऊतांचे मोठे वक्तव्य | पुढारी

स्वा. सावरकर विज्ञानवादी; गोमुत्रधारी हिंदुत्व त्यांना मान्य नव्हते - संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी होते. मात्र, त्यांचे हिंदुत्व विज्ञानवादी होते. गोमुत्रधारी हिंदुत्व त्यांना मान्य नव्हते, असं मोठं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. माध्यमांशी संवाद साधताने त्यांनी याविषयी आपले मत व्यक्त केले.

खासदार संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत मोठे वक्तव्य केले ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व हे विज्ञानवादी विचारांचे होते. त्यांना गोमुत्रधारी हिंदुत्व मान्य नव्हते.

रावसाहेब दानवे यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं; संजय राऊत यांचे आव्हान

संजय राऊत यांनी खासदार रावसाहेब दानवे यांचा मविआ निश्चितच पराभव करेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी यावेळी दानवे यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान देखील दिले आहे.

हे ही वाचा :

नाशिक : खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा

खासदार संजय राऊत यांच्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घणाघाती टीका; म्हणाले तर त्यांच्यासारखा…

Back to top button