Wrestlers march : कुस्तीपटूंचा हनुमान मंदिरापर्यंत मोर्चा, गुरुद्वाराला भेट

Wrestlers march : कुस्तीपटूंचा हनुमान मंदिरापर्यंत मोर्चा, गुरुद्वाराला भेट

पुढारी ऑनलाइन डेस्क : Wrestlers march : कुस्तीपटू बजरंग पुनिया-साक्षी मलिक यांच्यासह दिग्गज कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमूख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी केली आहे. यासाठी कुस्तीपटूंची निदर्शने सुरू कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांनी बुधवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराकडे मोर्चा काढला. त्यानंतर गुरुद्वारालाही भेट दिली.

गेल्या 25 दिवसांपासून जंतरमंतर येथे तळ ठोकून असलेले पैलवान मंगळवारी हनुमान मंदिरात गेले. यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यासह कुस्तीपटूंसह शेकडो समर्थक उपस्थित होते. यानंतर आंदोलक कुस्तीपटू बांगला साहिब गुरुद्वारामध्ये जाऊन नतमस्तक झाले. Wrestlers march

ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण विजेती विनेश फोगट यांच्यासह भारताचे अव्वल कुस्तीपटू गेल्या २५ दिवसांपासून जंतरमंतर येथे निदर्शने करत आहेत. एका अल्पवयीनासह सात महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. बृजभूषण यांना अटक करण्याची त्यांची मागणी आहे. Wrestlers march

कुस्तीपटूंनी मंगळवारी संकेत दिले होते की ते त्यांचे आंदोलन "राष्ट्रीय चळवळ" बनवण्यासाठी ते रामलीला मैदानावर आपला निषेध नोंदवू शकतात. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ चंद्रशेखर सोमवारी संध्याकाळी जंतर-मंतरवर पोहोचले होते. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना रात्री मैदान सोडण्यास सांगितले. ते निघून गेले आणि मंगळवारी पुन्हा समर्थकांसह परतले. त्यांनी कुस्तीपटूंना 21 मे नंतर रामलीला मैदानात जाऊन आंदोलन वाढवण्याचे आवाहन केले. खाप पंचायतींनी बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला २१ मेपर्यंतची मुदत दिली आहे. Wrestlers march

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news