शरद पवारांनी आज बोलावली महाविकास आघाडीची बैठक | पुढारी

शरद पवारांनी आज बोलावली महाविकास आघाडीची बैठक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव आणि काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक विचारात घेऊन रविवारी सायंकाळी ४ वाजता महाविकास आघाडीची बैठक घेणार आहेत.

गेल्या महिनाभरापासून आघाडीमध्ये बिघाडीचे चित्र दिसत होते. तिन्हीही पक्ष एकमेकांवर सरळ टीका करू लागल्यामुळे या पक्षांची वज्रमूठ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत राहील की, नाही अशी चर्चा सुरू झाली. मात्र, कर्नाटक निकाल लागताच शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी पुढाकार घेतला.

महाविकास आघाडीच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र असले तरी राज्यात वज्रमूठ सभा आयोजित करण्यात ठाकरे सेनेचा सहभाग मोठा होता. सभांची तयारीही एकटा हा गट पहात होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते फक्त भाषणापुरते येत असल्याचे जाणवत होते. मात्र, आता स्वतः शरद पवार यांनी पहिल्यांदाच आघाडीची बैठक लावण्याचे जाहीर केल्यामुळे तिन्ही पक्षांचे आक्रमक आणि एकीचे राजकारण यापुढे महाराष्ट्रात दिसेल, असा अंदाज आहे.

हेही वाचा : 

Back to top button