आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत: राज ठाकरे | पुढारी

आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत: राज ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरूवारी दिलेला निकाल संभ्रमात टाकणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे काय होणार ? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी २०२४ च्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आज (दि. १२) मीरा भाईंदर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारला दिलासा दिला आहे. त्यामुळे सरकारच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाही. याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणार आहे. त्याचबरोबर आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिली. तसेच त्यांचा पक्ष वेगळा आहे. माझा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाबद्दल प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवू नका, असे राज ठाकरे म्हणाले.

 

हेही वाचा 

Back to top button