California Senate : कॅलिफोर्निया ठरलं वांशिक भेदभावावर बंदी घालणार अमेरिकेमधील पहिलं राज्य

California Senate : कॅलिफोर्निया ठरलं वांशिक भेदभावावर बंदी घालणार अमेरिकेमधील पहिलं राज्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियाच्या सिनेटने वांशिक भेदभावावर बंदी घालणारा कायदा संमत केला आहे. असा कायदा संमत करणार कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे पहिले राज्य ठरले आहे. कॅलिफोर्नियाच्या राज्याच्या सिनेटने हे विधेयक ३४-१ मतांनी मंजुर करण्यात आलं आहे. हे विधियेक सिनेटर आयेशा वहाब यांनी सादर केले होते. (California Senate)

कॅलिफोर्निया राज्याच्या सिनेटने सिनेटर आयेशा वहाब यांनी गुरुवारी (दि.११) सादर केलेले SB 403 हे जातविरोधी विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक ३४-१ मतांनी मंजुर झाले आहे. म्हणजे या विधेयकाला ३४ सिनेटरची संमती आहे तर एक सिनेटर या विधेयकाच्या विरोधात एक मत पडले आहे. हे मत सेन ब्रायन जोन्स यांनी या कायद्याच्या विरोधात मतदान केले आहे. सभागृहात झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने 34 तर विधेयकाच्या विरोधात फक्त एक मत पडले. आता हे विधेयक विधानसभेत मांडले जाईल आणि त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

विधेयक SB 403  ज्यांना वंशीय भेदभाव आणि पूर्वग्रहामुळे नुकसान झाले आहे त्यांना संरक्षण देते. त्याचबरोबर जातीय भेदभाव आणि जात-आधारित हिंसाचारात सहभागी झालेले, हिंसाचारात सहभागी  होण्यासाठी परवानगी देते त्यांना शिक्षेची तरतुद केली आहे.

California Senate : कॅलिफोर्निया हे असे पहिले राज्य ठरले

अमेरिकन सिनेटमध्ये जातविरोधी विधेयक मंजूर झाल्यानंतर कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले आहे जिथे जातीच्या आधारावर भेदभाव बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. आता कॅलिफोर्नियामध्ये कोणी जातीयवाद केला तर त्याला मोठी किंमत मोजावी लागेल. सिएटल कौन्सिल सदस्या क्षमा सावंत, ज्यांनी सिएटलला वर्णद्वेषविरोधी भेदभावविरोधी कायदा पारित करणारे पहिले शहर बनवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांनी कॅलिफोर्निया राज्य सिनेटने SB 403 विधेयक मंजूर केल्याचं स्वागत केलं आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news