आजचे राशिभविष्य (०७ मे २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (०७ मे २०२३)

राशिभविष्य

मेष : भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे द़ृष्टिपथात येईल. जुन्या संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. आरोग्य एकदम चोख असेल.

वृषभ

वृषभ : अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा.

राशिभविष्य

मिथुन : व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल, पण आरोग्याला गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे.

कर्क

कर्क : तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल.

सिंह

सिंह : आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाईनमेंटवर तुम्हाला जाता न आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल, तुमचे तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा.

कन्या

कन्या : कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील.

तुळ

तूळ : शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. लोकांना नेमके काय हवे आहे हे समजावून घ्या

राशिभविष्य

वृश्चिक : हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. आज कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट इतरांपर्यंत जाऊ शकते.

राशिभविष्य

धनु : दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल; परंतु संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. कुटुंबाच्या गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल.

मकर

मकर : आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. स्वत:ची निंदा करून उत्साह घालवू नका.

कुंभ

कुंभ : स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते.

मीन

मीन : जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल.

 

                                                                                                                     – ज्यो. मंगेश महाडिक

 

Back to top button