राजधानी दिल्लीमध्ये दर लाखांमागे ५३४ क्षयरोगग्रस्त

राजधानी दिल्लीमध्ये दर लाखांमागे ५३४ क्षयरोगग्रस्त

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्ली जीवघेण्या प्रदूषणासह क्षयरोगासंबंधी (Tuberculosis) देखील अत्यंत जोखीम असलेले शहर बनले आहे. देशात दर एक लाख लोकसंख्येमागे ३१६ क्षयरोगग्रस्त आहेत. तर, दोन कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीत दर लाखांमागे ५३४ क्षयरोगग्रस्त असल्याची माहिती २०१९ ते २०२१ दरम्यान देशभरात करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आली आहे.

१५ वर्षांहून अधिक वय असलेल्या दिल्लीकरांमध्ये क्षयरोग (Tuberculosis) होण्याची जोKम सर्वाधिक आहे. गतवर्षी दिल्लीत ९८ हजार ४८३ क्षयरोगग्रस्त आढळले होते. गुजरात आणि केरळमध्ये सर्वात कमी क्षयरोगग्रस्तांची नोंद घेण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे १४१ आणि ११५ क्षयरोगग्रस्त आहेत.

दिल्लीसह राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा तसेच छत्तीसगढ मध्ये क्षयरोग संसर्गाची जोखीम अधिक असल्याचे अहवालातून अधोरेखित झाले आहे. एक लाख लोकसंख्येमागे राजस्थान मध्ये ४८४ लोक क्षयरोगग्रस्त आहेत. तर, उत्तर प्रदेशात ही संख्या ४८१, हरियाणा ४६५, छत्तीसगड मध्ये ४५४ आहे. मध्यप्रदेश ३८६, झारखंड ३५२, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर मध्ये ३४४ तसेच बिहार ३२७, पंजाबमध्ये २८३ नागरिक क्षयरोगग्रस्त आहेत.

महाराष्ट्रातील तीन जिल्हे सन्मानित

२०१५ च्या तुलनेत २०२१ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त घट घडवून आणणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. अकोला तसेच बीड जिल्ह्यांना देखील केंद्राच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. या जिल्ह्यांनी २०१५ च्या तुलनेत २०२१ मध्ये क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये २० टक्के पेक्षा जास्त घट घडवून आणल्याची कामगिरी केल्याने त्यांना नुकतेचे सन्मानित करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news