Sanjay Raut : ‘बारसू कारखाना सौदीच्या राजपूत्राचा, त्याच्यासाठी स्थानिकांनी जमिनी द्यायच्या का?’ – संजय राऊतांचा प्रश्न | पुढारी

Sanjay Raut : 'बारसू कारखाना सौदीच्या राजपूत्राचा, त्याच्यासाठी स्थानिकांनी जमिनी द्यायच्या का?' - संजय राऊतांचा प्रश्न

पुढारी ऑनलाइन डेस्क : सध्या कोकणातील बारसू या ठिकाणी रिफायनरी प्रकल्पावरून वाद शिगेला पोहोचला आहे. प्रकल्पाला विरोध करण्याासाठी मोठे आंदोलन पेटले आहे. याबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी बारसू कारखाना हा सौदीच्या राजपूत्राचा आहे, हा रिफायनरी प्रकल्प सौदीच्या राजपूत्राचा आहे, त्याच्यासाठी स्थानिकांनी जमिनी द्यायच्या का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना, उद्धव ठाकरे यांच्या कालच्या मुंबईच्या सभेत गर्दी नव्हती, अशी टिका करण्यात आली होती. यावर राऊत यांनी ज्यांना कालच्या सभेत गर्दी दिसली नाही त्यांनी डोळ्यांचे ऑपरेशन करून घ्यावे, असा टोला लगावला. तसेच उद्धव ठाकरे रत्नागिरी महाड येथेही जाणार, असेही राऊत म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे हे बारसूत जाणारच, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बारसू आंदोलनात बाहेरून लोक आले, हे अप्रत्यक्षपणे मान्य(Sanjay Raut )

दरम्यान, पत्रकारांनी बारसू आंदोलनात बाहेरून लोक आले होते. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. शेतकऱ्यावर कोठेही अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी सर्व देशातील शेतकरी एकत्र येतात. असे उत्तर संजय राऊत यांनी दिले. त्यामुळे अप्रत्यक्षपणे बारसू आंदोलनात बाहेरून लोक आले, हे संजय राऊत यांनी मान्य केले, असे सांगता येऊ शकते. (Sanjay Raut )

हे ही वाचा :

देशातील आंबा उत्पादन यंदा ५० लाख टनांनी कमी होणार

…ऐवजी आता ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे म्हणणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये- फडणवीस

Back to top button